शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: December 10, 2015 00:04 IST

मागण्यांना केवळ पाठिंबा : बहुतांशी संस्था सुरूच

नाशिक : शासनाचे शिक्षण धोरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत शिक्षण बचाव समितीने दिलेल्या दोन दिवसीय शाळा बंदला जिल्ह्णात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्णातील निम्म्याहून अधिक शाळा सुरू असल्याने बंदचा प्रभाव जाणवला नाही. आता गुरुवारी प्रतिसाद मिळावा, यासाठी बचाव समितीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.अनुदान पात्र शाळांना अनुदान नाही, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा रखडलेला प्रश्न, शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या रोजी रोटीवर गंडांतर आणणारा आकृतिबंध रद्द करावा, अशा राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन शिक्षण बचाव समितीच्या वतीने गेल्या महिनाभरापासून आंदोलने करण्यात येत असून, बुधवारी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस शाळा बंदची राज्यस्तरावर हाक देण्यात आली होती. नाशिकमध्ये या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्णात मोठ्या संख्येने शाळा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीसह अनेक संस्थाचालकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. परंतु प्रत्यक्ष सहभाग मात्र घेतला नाही. व्ही. एन. नाईक एज्युकेशन सोसायटी आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या दोन संस्थांच्या शाळा मात्र बंद होत्या. अनेक संस्थाचालकांनी मागण्या रास्त असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे या शाळा सुरू होत्या.शिक्षण बचाव समितीचे नाशिकचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी मात्र जिल्ह्णातील ७० टक्के शाळा बंद होत्या. मंगळवारी सायंकाळी शाळा बंदचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांपर्यंत निरोप पोहोचते झाले नाही, त्यामुळे उर्वरित शाळा सुरूच होत्या, असा दावा केला.