शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST

नाशिक : शहरासह जिल्हाभरातील शाळा सोमवारपासून (दि.४) सुरू होणार असून, तब्बल नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे. ...

नाशिक : शहरासह जिल्हाभरातील शाळा सोमवारपासून (दि.४) सुरू होणार असून, तब्बल नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहे. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वीच शहरातील काही खासगी शाळांनी शुल्कवसुलीसाठी मनमानी पद्धतीने ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची, तसेच संपूर्ण विषयांसाठी शाळेच्या तासिकांचे नियोजन करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोरोनाकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागलेल्या पालकांनी शाळांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून, गेल्या नऊ महिन्यांपासून ओस पडलेल्या साळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळांमध्ये सॅनिटायझर फवारणीसह जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेतील आवश्यकतेनुसार विज्ञान, इंग्रजी व गणित विषयांच्या शिक्षकांसह शिपाई, कारकून आणि मुख्याध्यापक अशा सहा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, आवश्यकतेनुसार शिक्षकांची कोरोना चाचणी करून शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण संस्थांनी केली आहे.

इन्फो-

सर्व विषयांचे वेळापत्रक

शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करताना, केवळ तीन तासिकांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या असून, उर्वरित विषयांचा अभ्यासक्रम ऑनलाइनद्वारेच शिकविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, नाशिक शहरातील काही खासगी शाळांनी संपूर्ण विषयांचे वेळापत्रक जाहीर करून ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. अशा प्रकारे ऑनलाइन शिक्षण बंद करून शाळांकडून सक्तीने शुल्कवसुलीचा घाट घातला जात असल्याचा आरोप पालक संघटनाच्या प्रतिनिधींना केला आहे.

इन्फो-

खासगी शाळा संघटनेवर कारवाईची मागणी

नाशिक शहरातील काही शाळांच्या संस्था चालकांनी खासगी शाळा संघटनेची स्थापना करून शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आता सोमवारपासून शाळा सुरू होत असताना, काही शाळांनी शुल्कवसुलीसाठी ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची भूमिका घेतली आहे. काही शाळांनी सर्वच विषयांचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.