शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शाळा प्रवेश वेळापत्रक

By admin | Updated: February 13, 2017 00:14 IST

आर्थिक दुर्बलांसाठी २५ टक्के : दिंडोरी तालुक्यातील विविध शाळांचा समावेश

 दिंडोरी : बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क २००९ अधिनियम कायदान्वये शाळांमध्ये वंचित व आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या असून ,त्याचे प्रवेश वेळापत्रक जाहीर झाले आहे. सन-२०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या ँ३३स्र://१३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइट्सवर आॅनलाइन पध्दतीने प्रवेश अर्ज भरले जाणार आहेत. यासाठीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- प्रवेश अर्ज भरणे- दि. ७ ते २४ फेब्रुवारी, पहिली लॉटरी- दि. २७ व २८ फेब्रुवारी, शाळेत जाऊन प्रवेश घेणे - १ ते ९ मार्च, शाळांनी रिक्त जागांची माहिती दर्शविणे- १० व ११ मार्च, दुसरी लॉटरी- १४ व १५ मार्च, शाळेत जाऊन प्रवेश घेणे- १६ ते २१ मार्च, शाळांनी रिक्त जागांची माहिती दर्शविणे- २२ व २३ मार्च, तिसरी लॉटरी- २४ व २५ मार्च, शाळेत जाऊन प्रवेश घेणे- २७ मार्च ते १ एप्रिल, शाळांनी रिक्त जागांची माहिती दर्शविणे- ३ ते ६ एप्रिल, चौथी लॉटरी- ७ व ८ एप्रिल, शाळेत जाऊन प्रवेश घेणे- १० ते १५ एप्रिल, शाळांनी रिक्त जागांची माहिती दर्शविणे- १७ व १८ एप्रिल, पाचवी लॉटरी- २० एप्रिल, शाळेत जाऊन प्रवेश घेणे- २१ ते २७ एप्रिल. याप्रमाणे प्रवेश प्रक्रि या असणार असून, प्रवेशासाठी पाल्याचा जन्माचा दाखला, वास्तव्याचा पुरावा (भाडे तत्त्वावर राहणाऱ्या पालकांनी नोंदणीकृत करारनामा प्रत जोडावी.) पालकांचा जातीचा दाखला, पालकांचा उत्पन्नाचा दाखला- २०१५-१६ (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न), पाल्य अपंग असेल अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र पालकांची सादर करावे. याबाबत काही तक्र ार असल्यास दिंडोरी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी एस एस घोलप यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दिंडोरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

दिंडोरी तालुक्यातील खालील शाळांमध्ये पालकांना २५ टक्के राखीव जागेवर प्रवेशासाठी अर्ज भरता येईल. त्यात आत्ममालिक इंग्लिश मीडियम स्कूल जऊळके, निर्मिती इंग्लिश मीडियम स्कूल कोऱ्हाटे, गोल्डन किड्स इंग्लिश मीडियम दिंडोरी, किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल मनोरी, पुंडलिकदादा जोंधळे इंग्लिश स्कूल जऊळके, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल वणी, संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल वणी, ऋषीलॅन्ड इंग्लिश मिडीयम स्कुल, उड्डाण इंग्लिश मिडीयम स्कुल दिंडोरी, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल दिंडोरी, कादवा इंग्लिश मिडीयम स्कुल राजारामनगर, अभिनव बालविकास मंदिर मोहाडी, उषाताई देशमुख इंग्लिश मिडीयम स्कुल लाखमापुर , अभिनव बालविकास मंदिर खेडगाव , दिल्ली पब्लिक स्कुल मानोरी, अभिनव बालविकास मंदिर कोऱ्हाटे, उत्कर्ष पब्लिक स्कुल ढकांबे , अभिनव बालविकास मंदिर दिंडोरी ,अभिनव बालविकास मंदिर निळवंडी ,अभिनव बालविकास मंदिर करंजवण, निक्स इंग्लिश मिडीयम स्कुल उमराळे ब्रु, मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कुल खेडगाव , बालभारती पब्लिक स्कुल शिवाजीनगर दिंडोरी , रायझींग वंडर इंग्लिश मिडीयम स्कुल धागुर, लिली आॅफ व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कुल चौसाळे, माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कुल चाचडगाव , अभिनव बालविकास मंदिर वरखेडा ,नाशिक पब्लिक स्कुल ढकाब, बॉम्बे पब्लिक स्कुल ढकांबे आदी शाळेमध्ये प्रवेश मिळेल. (वार्ताहर)