शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार घरकुलांची योजना साडेसहा हजारांत गुंडाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:02 IST

नाशिक : महापालिकेच्या वतीने एकेकाळी वाजतगाजत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची उतरती कळा कायम असून, १६ हजार घरांची योजना आता साडेसहा हजारांवरच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेत आत्ता फक्त साडेसातशे लाभेच्छुकांना घरे देणे शिल्लक असून, निवडणुकीसाठी असलेली आदर्श आचारसंहिता संपताच हा विषय मार्गी लागणार आहे.

ठळक मुद्देनेहरू अभियान : आता फक्त साडेसातशे कुटुंबांना मिळणार निवारा

नाशिक : महापालिकेच्या वतीने एकेकाळी वाजतगाजत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची उतरती कळा कायम असून, १६ हजार घरांची योजना आता साडेसहा हजारांवरच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेत आत्ता फक्त साडेसातशे लाभेच्छुकांना घरे देणे शिल्लक असून, निवडणुकीसाठी असलेली आदर्श आचारसंहिता संपताच हा विषय मार्गी लागणार आहे.केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शहरात शासकीय आणि निमशासकीय भूखंडांवर घरकुल योजना बांधण्याचा महापालिकेने प्रस्ताव तयार केला. त्यावेळी सोळा हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठरविले होते. मात्र, ज्याठिकाणी झोपडपट्टी आहे, त्याचठिकाणी योजना राबविण्याचे आदेश असतानाही त्यात केलेले बदल आणि शहराबाहेर चुंचाळे येथे राबविण्यात आलेली सहा हजार घरांची योजनाही वादग्रस्त ठरली त्यातच घरकुल योजना भलत्याच ठिकाणी राबविण्यामुळे तर नागरिकांचा रोषही पालिकेला त्रासदायक ठरला. त्यातून घरकुलांची संख्या कमी कमी होत गेली. आधी सोळा हजार घरे त्यानंतर बारा हजार मग अकरा हजार आणि त्यानंतर ९ हजार ५०० आणि आता साडेसहा हजार घरकुलेच योजनेत देण्यात आली आहेत. ज्या गोरगरिबांच्या नावाखाली महापालिकेने ही योजना राबविली. त्यात मूळ योजनेच्या तीस टक्के रक्कम महापालिकेला खर्च करणे बंधनकारक होते. त्यानुसार खर्च तर झालाच शिवाय भूसंपादनाचा खर्च महापालिकेकडे असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारने निधी देऊनही प्रत्यक्षात महापालिकेला ही योजना अत्यंत महागात पडली, असेही स्पष्ट झाले. घरकुल योजनेतील अनेक गैरव्यवहार तसेच महापालिकेच्या एमआयडीसीचा भूखंड घेताना जादा रक्कम देणे, रद्द झालेली घरकुल योजना पुन्हा राबविणे असे अनेक प्रताप प्रशासनाने केले. परंतु अव्वाच्या सव्वा रक्कम देऊनदेखील महापालिका हद्दीतील किमान शासकीय आणि निमशासकीय भूखंडेही झोपडपट्टीमुक्त होऊ शकली नाही आणि गंजमाळसारख्या ठिकाणी तर झोपडपट्ट्या तोडल्या आणि घरकुल योजनाही राबविली गेली नाही, असा प्रकार घडला. घरकुलात खरे लाभार्थी किती?महापालिकेच्या वतीने घरकुल योजना राबविण्यात आल्यानंतर पालिकेने संबंधित झोपडपट्टी असलेला परिसर मोकळा करून त्याला कुंपण घालणे बंधनकारक होते. परंतु घरकुल योजनेत घरे घेऊन प्रत्यक्षात पुन्हा झोपडपट्टीत जाऊन राहणारेदेखील सापडले असून, त्यामुळे ही योजना खरोखरच यशस्वी झाली काय या विषयीच शंका व्यक्त केली जात आहे.