शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीतील पाणीचोरीमुळे टंचाई

By admin | Updated: March 24, 2017 23:42 IST

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत आहे.

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून देशवंडी येथे पाणी पोहोचत नसल्याने व तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.देशवंडी, जायगाव, वडझिरे, मोह, चिंचोली आदि गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून पाणीचोरी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या योजनेतील शेवटच्या व उंचावर असलेल्या देशवंडीकरांना गेल्या महिनाभरापासून पाणीच मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची पायपीट वाढली असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप गेल्या दोन महिन्यापासून या वाढत्या चोऱ्यांमुळे नायगाव व देशवंडी येथील जलकुंभापर्यंत मुख्य जलवाहिनीचा दाब कमी झाल्याने पाणी पोहोचत नसल्याने ही पाणीटंचाई निर्माण होत आहे. मोह येथील योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून नायगाव येथील पंपिंगपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीतून अनेक ठिकाणी पाणी चोरी होत असल्याचे बोलले जात आहे. या वाढत्या पाणीचोरीमुळे ही योजना ऐन उन्हाळ्यात कुचकामी ठरत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वा वाढत्या चोऱ्या थांबवून नायगाव व देशवंडी या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी देशवंडी व नायगाव येथील महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)या योजनेद्वारे मिळणाऱ्या दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक-पुणे महामार्गाच्या कामामुळे या योजनेला चेहडी येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याचे वारंवार घडत असल्याने ही योजना अधून मधून बंद होत असते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या मुख्य जलवाहिनीतूनच पाणीचोरीचे प्रमाण वाढत चालल्याने नायगाव ते देशवंडी येथील या योजनेचे जलकुंभ पूर्णक्षमतेने भरले जात नसल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे.