नाशिक : श्री चित्रगुप्त कायस्थ समाजबांधवांचा आनंद स्नेहमेळावा नुकताच उत्साहात झाला. यावेळी विविध कार्यक्रमांसह खेळ घेण्यात आले. आयोजक जयप्रकाश कायस्थ यांचा व नुकतीच सीए उत्तीर्ण झालेल्या तेजश्री श्रीवास्तव हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. संतोष श्रीवास्तव, तुषार श्रीवास्तव, नरेंद्र श्रीवास्तव, मंगेश कायस्थ, हर्षल श्रीवास्तव, अमोल कायस्थ, कमलेश कायस्थ, अमित कायस्थ आदिंनी नियोजन केले. कार्यक्रमातील खेळांत आबालवृद्धांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
चित्रांश आनंदस्नेह मेळावा उत्साहात
By admin | Updated: October 24, 2014 01:02 IST