मनमाड : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे वेधले लक्ष मनमाड : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील रेल्वे कारखान्यातील आॅल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशनच्या वतीने प्रवेषद्वारासमोर विरोध प्रदर्शन व धरणे आंदोलन करण्यात आले.अनु.जाती/अनु.जनजाती वर्गातील पदोन्नतीची तरतूद असलेले प्रलंबित ११७वे संविधान संशोधन विधेयक पास करावे, डीओपीटी मंत्रालयाद्वारा लादण्यात आलेली १३ बिंदू रोस्टर पद्धत बंद करावी, नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी योजना लागू करावी, रेल्वे कोर्स पूर्ण केलेल्या ट्रेंड अॅप्रेंटिस कर्मचाऱ्यांना रेल्वे सवेत सामावून घ्यावे, रेल्वे विभागातील खासगीकरण थांबवावे, न्यायिक व खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे आदी मागण्यांसाठी आज दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.सायंकाळी झालेल्या सभेमध्ये असोसिएशनचे सतीश केदारे, सागर साळवे, सचिन इंगळे, सिद्धार्थ जोगदंड यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी किरण अहिरे, संदीप पगारे, रवींद्र पगारे, विजय गेडाम, संतोष सावंत, सुनील सोनवणे, अनिल अहिरे, संदीप धिवर, फकिरा सोनवणे, किशोर खंडागळे, सुभाष जगताप, प्रशांत मडावी, हर्षद सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवीण अहिरे व सिद्धार्थ जोगदंड यांनी आभार व्यक्त केले.
एससी, एसटी असोसिएशनचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 21:30 IST
मनमाड : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे वेधले लक्ष मनमाड : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील रेल्वे कारखान्यातील आॅल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशनच्या वतीने प्रवेषद्वारासमोर विरोध प्रदर्शन व धरणे आंदोलन करण्यात आले.
एससी, एसटी असोसिएशनचे धरणे
ठळक मुद्दे प्रवेषद्वारासमोर विरोध प्रदर्शन व धरणे आंदोलन