शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नाशिकच्या सायली, तनिशा भारतीय संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

नाशिक : ट्यूनिशिया येथे होणाऱ्या डब्लूटीटी युथ कंडेंडर १५ वर्षे वयोगटाखालील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या सायली वाणी व ...

नाशिक : ट्यूनिशिया येथे होणाऱ्या डब्लूटीटी युथ कंडेंडर १५ वर्षे वयोगटाखालील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या सायली वाणी व तनिशा कोटेचाची मुलींच्या भारतीय संघात निवड झाली आहे.

या स्पर्धा दि. १३ ते १६ सप्टेंबरदरम्यान होणार आहेत. या संघात पुण्याच्या प्रिथा वर्टीकर व हरियाणाच्या सुहाना सैनी यांचाही समावेश आहे. सायली ही राष्ट्रीय स्तरावर प्रथम मानांकित, तर तनिशा ही तृतीय मानांकित आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून नाशिकच्या टेबल टेनिसपटूंची राज्य व राष्ट्रीयस्तरावर कामगिरी उल्लेखनीय आहे. सायली वाणी हिने मार्चमध्ये इंदोर येथे झालेल्या २०२० च्या राष्ट्रीय अजिंक्य टेबल टेनिस स्पर्धेत सब ज्युनिअर मुलींच्या गटाचे राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते, तर तनिशा हिने कांस्यपदक पटकावले होते. तनिशानेसुद्धा याआधी २०१९ मध्ये मस्कद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ज्युनिअर सर्किट टेबल टेनिस स्पर्धेत कॅडेट मुलींच्या संघाचे भारताचे प्रतिनिधित्व करून कांस्यपदकही पटकावले होते. जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघी नियमित सराव करतात. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा आज नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, तसेच नाशिक जिमखान्याचे सचिव राधेश्याम मुंदडा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव शेखर भंडारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संघटनेचे मिलिंद कचोळे, सतीश पटेल, अली आदमजी व अभिषेक छाजेड, तसेच प्रशिक्षक जय मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.

इन्फो

दोन मुली प्रथमच राष्ट्रीय संघात

नाशिकच्या दोन मुली एकाचवेळी भारताचे प्रतिनिधित्व पहिल्यांदा करीत आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जर्मनी, उझबेकिस्तान, इजिप्त, अल्जेरिया, घाना, ट्यूनिशिया, मालदीव, बेल्जियम आदी देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत.

फोटो

०८सायली, तनिशा