शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

...म्हणे कुंभमेळ्यात शिरेल बिबट्या

By admin | Updated: March 22, 2015 23:44 IST

वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षकाचा अजब निष्कर्ष

नाशिक : चांदवड येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू वनकर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप होत असताना आपले कर्मचारी हेच कसे योग्य आहेत याचा डंका पिटणाऱ्या मुख्य वनसंरक्षकांनी आता अजबच विधान केले आहे. कुत्र्याच्या वासाने म्हणे बिबटे शहरात येऊ शकतात, त्यामुळे कुंभमेळ्याच्या परिसरात कुत्रे फिरकणार नाहीत याची दक्षता घ्यावी असा सल्लाही त्यांनी व्यासपीठावर उपस्थित पालिका मुखंडांना देऊन टाकला.कुंभमेळ्यात उघड्यावर अन्नपदार्थ टाकले गेल्यास त्यावर ताव मारण्यासाठी कुत्र्यांच्या झुंडी येतील. त्यामुळे कुत्र्यांना भक्ष्य बनविण्यासाठी कदाचित बिबट्यादेखील कुंभमेळ्यात ‘दर्शन’ देण्याची शक्यता महाशयांनी वर्तविली. कुत्रा हा प्राणी अत्यंत सहजपणे बिबट्याला उपलब्ध होतो. बिबट्याला बघताच कुत्र्यांची पाचावर धारण बसते व बिबट्या कुत्र्याला भक्ष्य बनवितो, असा त्यांचा दावा आहे. खरे तर अवघे शहर कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने आणि उपद्रवाने त्रस्त झाले आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचे करायचे काय असा प्रश्न महापालिकेलाही पडला आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र वन अधिकाऱ्यांनी कोणत्या आकडेवारीच्या आधारे असा निष्कर्ष काढला हे मात्र समजण्यापलीकडचे आहे. तसे असेल तर शहरातील कुत्र्यांची संख्या पाहता बिबट्यांचा वावर शहरातच असायला हवा. दररोज कुठेना कुठे बिबट्याने कुत्र्याला भक्ष्य केल्याच्या घटना घडायला हव्यात, मात्र अशी कोणतीही घटना किंवा सर्वेक्षण नसताना मुख्य वनसंरक्षकांनी कोणत्या आधारे हे विधान केले हे त्यांनाच ठाऊक !त्यांच्या या विधानामुळे आणि कुत्र्यांच्या संख्येमुळे बिबट्या शहरातच वावरत नसेल कशावरून, अशी भीती नाशिककरांच्या मनात निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)