नाशिक : मालेगावहून मुंबईला जाणारे सोळा टन मांस आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़३१) रात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलजवळ जप्त करण्यात आले़ याप्रकरणी मालेगाव व धुळे येथील तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असिम अहमद सय्यद (३७, रा़ मालेगाव), हनिफ हसन पठाण (३२, रा़ मालेगाव) व फारूख तय्यब अली (३३, रा़ वडजाई रोड, गफूरनगर, धुळे) हे तिघे ट्रकमधून (एमएच १५, ईजी ३२८२) मांस घेऊन मुंबईला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ या माहितीनुसार रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा ट्रक अडवून पोलिसांनी जप्त केला़ या ट्रकमध्ये २ लाख ३५ हजार किमतीचे १६ हजार ५४० किलो मांस होते़ पोलिसांनी गोमांस व ट्रक असा ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या प्रकरणी पशुकल्याण अधिकारी विकास गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात पशुसंवर्धन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सव्वादोन लाखांचे १६ टन मांस जप्त
By admin | Updated: January 2, 2017 00:52 IST