शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

सभापतिपदी सावंत यांची फेरनिवड

By admin | Updated: July 22, 2014 01:06 IST

सभापतिपदी सावंत यांची फेरनिवड

इगतपुरी पंचायत समिती : चिठ्ठी प्रक्रियेत झाला चमत्कारघोटी : इगतपुरी पंचायत समितीत रंगलेल्या अविश्वास ठराव नाट्यानंतर आज झालेल्या सभापती व उपसभापतिपद निवडणुकीच्या वेळी चमत्कार होऊन सभापतिपदाची माळ पुन्हा ठकूबाई सावंत यांच्याच गळ्यात पडली, तर उपसभापतिपदी रिपाइंच्या सविता जगताप यांची वर्णी लागली. आमदार गट व विरोधी गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.तहसीलदार महेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात निवडणूक घेण्यात आली. सभापतिपदासाठी ठकूबाई सावंत व जिजाबाई कौले यांनी तर उपसभापतिपदासाठी सविता जगताप व वैशाली सहाने व रमेश जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या वेळेत रमेश जाधव यांनी माघार घेतली मतदानात सभापतिपदासाठी दोघांनाही समान मते पडली. यावेळी चिठ्ठीव्दारे निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ठकूबाई सावंत यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली, तर उपसभापतिपदासाठीही चिठ्ठी पद्धतीने निवड करण्यात आली. यात सविता जगताप यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना उपसभापती म्हणून जाहीर करण्यात आले. जिजाबाई कौले यांच्या गटाकडे गोपाळ लहांगे, पांडुरंग वारुंगसे, मुक्ता गोवर्धने, वैशाली सहाणे होते, तर ठकूबाई सावंत गटाकडे रमेश जाधव, हरिदास लोहकरे, लहानू हिंदोळे, सविता जगताप होते. या धक्कादायक निकालाने राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा होत होती. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)