शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिकाधारकांवर संक्रांत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:34 IST

झारखंड येथे आधार क्रमांक रेशनकार्डाला लिंक नसल्याच्या कारणावरून धान्य नाकारण्यातून भूकबळीमुळे एका मुलीला जीव गमवावा लागल्याच्या घटनेची दखल घेत केंद्र सरकारने आधारशिवायही रेशनमधून धान्य देण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असल्या तरी, जिल्ह्णातील सव्वादोन लाख कुटुंबांची अद्याप आधार जोडणी झालेली नाही. या जोडणीसाठी आठ ते नऊ महिने लागणार असल्याने नजीकच्या काळात या कुटुंबांना धान्य मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : झारखंड येथे आधार क्रमांक रेशनकार्डाला लिंक नसल्याच्या कारणावरून धान्य नाकारण्यातून भूकबळीमुळे एका मुलीला जीव गमवावा लागल्याच्या घटनेची दखल घेत केंद्र सरकारने आधारशिवायही रेशनमधून धान्य देण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असल्या तरी, जिल्ह्णातील सव्वादोन लाख कुटुंबांची अद्याप आधार जोडणी झालेली नाही. या जोडणीसाठी आठ ते नऊ महिने लागणार असल्याने नजीकच्या काळात या कुटुंबांना धान्य मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकाने त्याच्या शिधापत्रिकेवर नाव असलेल्या सर्व व्यक्तींचे आधारक्रमांक पुरवठा खात्याकडे देऊन ते शिधापत्रिकेशी  लिंक केल्याशिवाय धान्य देऊ नये, असे आदेश मे महिन्यातच जारी केले होते. त्यानुसार सर्व रेशन दुकानदारांनी आपल्या शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक गोळा करून ते पुरवठा खात्याच्या ताब्यात दिले होते.  रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे आधार गोळा करून दिलेले असतानाही त्यापैकी एक ते दोनच व्यक्तींचे आधार जोडणी करून अन्य व्यक्तींची जोडणी केलेलीच नाही. अखेर ठेकेदाराने काम पूर्ण न करताच देयके घेऊन गाशागुंडाळला आहे. आधार जोडणीसाठी होणारा विलंब पाहता शासनाने सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली व त्यानंतर आता जानेवारी महिन्यापर्यंत आधार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे दुकानदारांनी गोळा केलेल्या आधारची माहिती पुरवठा खात्याकडे सुपुर्द करण्यात आली, परंतु जिल्ह्णातील सव्वादोन लाख शिधापत्रिकाधारकांची जोडणी बाकी आहे. या कामासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने जानेवारी महिन्यापासून आधार नसल्यास धान्य देणे बंद करण्याचे ठरविले तर सव्वादोन लाख कुटुंबांना त्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.शिधापत्रिकाधारकांचे आधार लिंक करण्यासाठी शासनाने नाशिक जिल्ह्णासाठी ६० लाख रुपयांची तरतूदही केली. पुरवठा खात्याने या कामासाठी ठेकेदाराची नेमणूक केली व प्रतिकार्डामागे पाच रुपये ६२ पैसे इतक्या दराने कामाचा ठेका दिला होता. ठेकेदाराने सप्टेंबर महिन्यात संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण न करताच गाशा गुंडाळला. पुरवठा खात्याने सदर ठेकेदाराला आजवर जवळपास २१ लाखांच्या आसपास रक्कम आजवर अदा केली असली तरी, प्रत्यक्षात ठेकेदाराने काम पूर्ण केलेलेच नाही. ज्या कामांचे देयके त्याला अदा करण्यात आले, ते कामदेखील त्याने परिपूर्ण केलेले नाही.