नाशिक : श्रावण महिन्यानिमित्त श्री कृष्णतीर्थ आश्रम, श्री विश्वनाथ महादेव मंदिर, जुना आडगाव नाका, पंचवटी येथे सव्वा लाख पार्थिव शिवलिंग तसेच महारुद्राभिषेकाचे आयोजन ‘श्री १०८ स्वामी रामतीर्थ महाराज’ यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. दि. ३ पासून महारुद्राभिषेकास प्रारंभ झाला आहे. सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शिवलिंग तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पंडित सत्यगोविंद पाराशर यांनी दिली.
सव्वा लक्ष शिवलिंग महारुद्राभिषेक
By admin | Updated: August 12, 2016 23:20 IST