शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सावकी ग्रामपंचायतीत प्रगती पॅनल विजयी

By admin | Updated: April 20, 2016 00:23 IST

सावकी ग्रामपंचायतीत प्रगती पॅनल विजयी

 लोहोणेर : देवळा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या सावकी (लो) ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाचे माजी सरपंच अरुण शिवले व कारभारी पवार, सुरेश पाटील, प्रताप पाटील यांच्या गटाने सत्ता अबाधित राखून गावावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पंचायत समितीचे सभापती अशोक बोरसे समर्थकांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. सावकी ग्रामपंचायतीची निवडणूक पंचायत समितीचे सभापती अशोक बोरसे यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र सुरेश पाटील, धर्म शिवले, प्रताप पाटील, पोपट तिवारी, भाजपाचे किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील आदिंच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने अशोक बोरसे यांच्या नम्रता पॅनलचा दणदणीत पराभव केला. कारभारी पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नऊ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले, तर अशोक बोरसे यांच्या पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले.विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेली मते) - वार्ड क्र -१ कारभारी पवार (३२३ ), रामदास गोधडे (३०१), आक्काबाई गायकवाड (३११), वार्ड क्र. २- भिका वाघ (३९६), उषाबाई सोनवणे (४३२), सुवर्णा पाटील (४०६), वार्ड क्र. ३- मनीषा सोनवणे (२५७), अहिल्याबाई पवार (२७९), अरुण पाटील (२६८), वार्ड क्र. ४- संजय गांगुर्डे (१५३), वैशाली बोरसे (१३८) आदिंचा समावेश आहे. निकाल घोषित होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. सावकी गावातून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सुरेश पाटील, प्रताप पाटील, धर्म शिवले, दशरथ अहिरे, वसंत देवरे, गणेश तिवारी, पुंडलीक शिवले, दिनकर पाटील, शरद निकम, जिभाऊ शिवले, भाऊसाहेब पवार, कांतीलाल दुबे, रमेश अहिरे, राजू गांगुर्डे, भिका गायकवाड, संजय गायकवाड, केवळ भामरे, दिलीप तुकाराम पाटील यांसह समर्थक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)