शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खळ्यास आग लागल्याने सव्वा लाखाचे नुकसान

By admin | Updated: February 2, 2016 23:33 IST

आडवाडी : वीजवाहक तारांमुळे गवत पेटल्याचा संशय

 ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातल्या ठाणगावजवळील आडवाडी (वरची) येथे खळ्यास आग लागल्याने मळणीसाठी ठेवलेले वरई, भात, नागली, ज्वारी आदि पिकांसह जनावरांचा चारा जळून खाक झाला. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेत शेतकऱ्याचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. खळ्याजवळच असलेल्या वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आडवाडी (वरची) येथील गट नंबर ४४५ मध्ये दत्तू किसन बिन्नर यांच्या मालकीचे खळे आहे. त्यात बिन्नर यांनी ५० क्विंटल भात, १२ क्विंटल वरई, २ क्विंटल नागली, ५ क्विंटल ज्वारी ही पिके मळणीसाठी ठेवली होती. जनावरांसाठी इगतपुरी तालुक्यातून विकत आणलेल्या वाळलेल्या गवताच्या तीन हजार पेंड्यांची वळई खळ्याजवळ रचलेली होती. मंगळवारी दुपारी गावाजवळील श्रीकृष्ण मंदिरात सुरेश बिन्नर, पाटीलबुवा बिन्नर, मदन बिन्नर, शिवाजी बिन्नर यांच्यासह ग्रामस्थ बसलेले होते. यावेळी त्यांना आगीचे प्रचंड लोट आणि धूर दिसू लागले. ग्रामस्थांनी घरांतील पाणी घेऊन आग विझवण्यासाठी खळ्याकडे धाव घेतली. तथापि, तोपर्यंत चाऱ्यासह पिकांनी चांगलाच पेट घेतला होता. आगीची माहिती सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास कळविण्यात आली. अडीच वाजेच्या सुमारास अग्निशमन बंबाची गाडी आल्यानंतर आग विझविण्यात यश आले. (वार्ताहर)