शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्यम खंडाळेला खंडणी वसुलीप्रकरणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:49 IST

हिरावाडी परिसरातील रहिवाशाला शेतजमिनीच्या व्यवहारापोटी भ्रमणध्वनीवरून धमकावत तीस लाख रुपयांची खंडणी वसुलीप्रकरणी मनसेचा सरचिटणीस व शिवमुद्रा मित्रमंडळाचा अध्यक्ष सत्यम खंडाळे यास पंचवटी पोलिसांनी गुरुवारी (दि.१२) अटक केली.

पंचवटी : हिरावाडी परिसरातील रहिवाशाला शेतजमिनीच्या व्यवहारापोटी भ्रमणध्वनीवरून धमकावत तीस लाख रुपयांची खंडणी वसुलीप्रकरणी मनसेचा सरचिटणीस व शिवमुद्रा मित्रमंडळाचा अध्यक्ष सत्यम खंडाळे यास पंचवटी पोलिसांनी गुरुवारी (दि.१२) अटक केली. खंडाळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत (दि.१५) पोलीस कोठडी सुनावली. वकीलपत्र काढून घेतल्याचा राग मनामध्ये धरून धमकावणारे अ‍ॅड. राजेंद्र खंदारे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या शेतजमिनीच्या व्यवहारापोटी खंडणी मागणाºया खंडाळे व एका वकिलावरा याबाबत हिरावाडीरोड पार्वती पॅलेस येथे राहणाºया संतोष शांताराम तूपसाखरे यांनी तक्रार दिली होती. यांनी तक्र ार दाखल केली आहे. तूपसाखरे यांच्या वडिलोपार्जित असलेल्या १८ एकर जमिनीविषयी १९९२ साली दिवाणी दावा दाखल केला होता. तूपसाखरे यांना दाव्यापोटी मोठी रक्कम मिळाल्याने संशयित वकील खंदारे यांनी तूपसाखरे यांच्याकडे तीस लाख रुपयांची मागणी करून पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिली होती. महिनाभरापूर्वी मनसेचा शहर सरचिटणीस सत्यम खंडाळे याने खंदारेच्या सांगण्यावरून तूपसाखरे यांना धमकावत ‘खंदारे वकिलाने मागणी केलेली रक्कम माझ्या कार्यालयात मुकाट्याने आणून दे, नाहीतर हात, पाय तोडून टाकेल’ अशी धमकी दिली. या प्रकारानंतर तूपसाखरे यांनी थेट पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे तक्र ार केली. त्यानंतर सिंगल यांच्या आदेशान्वये पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर व पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी संशियत खंडाळे व खंदारे यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास उबाळे करीत आहेत.