कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सर्वच लसीकरण केंद्रावर डोस घेण्यासाठी गर्दी होत असल्याने आरोग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. आरोग्य विभागही जास्तीत जास्त प्रमाणात लसींचा पुरवठा करत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांच्या उपस्थितीत लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दापूर व धुळवड येथील ६३९नागरिकांना, नांदूरशिंगोटे उपकेंद्रांतर्गत कणकोरी येथे ३६७ तर चास उपकेंद्रांतर्गत ४०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. अशाप्रकारे दिवसभरात तब्बल १४०६ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पहिला व दुसरा डोस मिळून एकूण १४ हजार लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. डॉ. म्हस्के यांनी गावनिहाय नियोजन केले होते. लसीकरण यशस्वीरीत्या होण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रणाली दिघे, डॉ. श्रद्धा आव्हाड, रत्नमाला पोळ, आरोग्य सेविका जी. पी. भारती, एल. एस. कापरे, के. पी. पालवे, एस. एम. माळी, एम. एम. साळुंखे, अमोल सानप, विठ्ठल वणवे, योगेश भालेराव यांनी प्रयत्न केले.
फोटो - १२ दापूर लसीकरण
सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्याप्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रणाली दिघे, एल.एस. कापरे, रामनाथ सांगळे, रोहित बुचकुल, मनीषा आहिरे व आशा कर्मचारी.
120921\12nsk_14_12092021_13.jpg
फोटो - १२ दापूर लसीकरण