शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर औद्योगिक वसाहतीत चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: June 27, 2017 20:30 IST

आठवड्यात तीन चोरीच्या घटना : औद्योगिक वसाहतीतील चोऱ्यांच्या संख्येत वाढ; बंदोबस्ताची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच आठवड्यात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत़ रविवारी पुन्हा औद्योगिक वसाहतीतील धुमाळ इंडस्ट्रीज कंपनीच्या अकौंट कार्यालयाची काच फोडून चोरट्यांनी पावणे तीन लाख रुपये चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास सातपूर पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे़ पंचवटीतील महालक्ष्मीनगर येथील रहिवासी तुषार दिनेश जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची सातपूर औद्योगिक वसाहतीत धुमाळ इंडस्ट्रीज कंपनी आहे़ रविवारी (दि़२५) रात्री आठ ते सोमवारी (दि़२६) सकाळी नऊ वाजेदरम्यान चोरट्यांनी कंपनीच्या वरच्या मजल्यावरील अकौंट कार्यालयाची काच फोडून कंपनीत प्रवेश केला़ तसेच या कार्यालयातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील २ लाख ७५ हजार रु पयांची रोकड चोरून नेली. सातपूर औद्योगिक वसाहतीतील चोरट्यांची भीड चेपली गेली असून, कंपनीच्या सुरक्षारक्षकांवर दगडफेक करण्यापर्यंत मजल गेली आहे़ याप्रकरणी जोशी यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. --इन्फो--आठवड्यातील तिसरी घटनाऔद्योगिक वसाहतीतील कंपनीत चोरी होण्याची ही तिसरी घटना आहे़ गोविंदसन प्लाझा लाइट इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीतील शौचालयाची खिडकी तोडून चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करून २३ हजार १८१ रुपये किमतीची ४८ किलो वजनाची झिंक आणि कॉपर वायर चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) घडली़ तसेच सुरक्षारक्षक रुद्रप्रताप सिंग तसेच त्यांच्या सहकारी सुरक्षारक्षकांवर दगडफेक करून पलायन केले़ यानंतर दुसरी चोरीची घटना डेराडेकस पॉवर स्विचेस या कंपनीत घडली होती़ चोरट्यांनी या कंपनीतील बायोमेट्रिक मशीन तोडून नुकसान केले़ तसेच कंपनीतील सोलर मेटल व रोख रक्कम असा ९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़