शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सतीश चिखलीकर प्रकरण वेगळ्या वळणावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:09 IST

नाशिक : चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदाराचे देयक मंजूर करण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व त्यांच्या सहकाºयाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याने वेगळेच वळण घेतले आहे. जप्त मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानंतरही परत न केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विरोधात चिखलीकर यांनी अवमान याचिका दाखल केली तर लाचलुचपत खात्यानेही सखोल चौकशीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने तपास अधिकाºयाला चौकशीचे अधिकार आहेतच, असे म्हणत खात्याचा अर्ज निकाली काढला आहे.

ठळक मुद्दे चिखलीकर यांनी अवमान याचिका दाखल केली सार्वजनिक बांधकाम खात्यात चालणाºया भ्रष्टाचाराची सर्वत्र चर्चा झडली होती

नाशिक : चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदाराचे देयक मंजूर करण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व त्यांच्या सहकाºयाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याने वेगळेच वळण घेतले आहे. जप्त मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानंतरही परत न केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विरोधात चिखलीकर यांनी अवमान याचिका दाखल केली तर लाचलुचपत खात्यानेही सखोल चौकशीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने तपास अधिकाºयाला चौकशीचे अधिकार आहेतच, असे म्हणत खात्याचा अर्ज निकाली काढला आहे. संपूर्ण राज्यात या घटनेने खळबळ उडाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे मोठे घबाड सापडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्यात चालणाºया भ्रष्टाचाराची सर्वत्र चर्चा झडली होती.लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बेहिशेबी मालमत्तेचा शोध घेऊन ती जप्त केली असून, त्यातील काही मालमत्ता परत मिळावी यासाठी सतीश चिखलीकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता व न्यायालयानेही काही मालमत्ता परत करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिले होते. परंतु न्यायालयाचे आदेश होऊनही मालमत्ता परत मिळाली नसल्याने चिखलीकर यांनी येथील विशेष न्यायाधीश पांडे यांच्याकडे अवमानना याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने नोटीस बजावल्याने गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक उगले हे स्वत:च न्यायालयासमोर हजर झाले होते.तत्पूर्वी बुधवारी चिखलीकर प्रकरणाचा तपास करणारे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक घाडगे यांनी विशेष न्यायालयात चिखलीकर यांच्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून, काही बाबींचा सखोल तपास करणे बाकी असल्याने १७३ कायद्यान्वये तपासाची अनुमती मिळावी, असा अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर न्या. पांडे यांनी, कायद्याने तपास अधिकाºयाला तशी परवानगी असल्यामुळे अधिक चौकशीसाठी नवीन अर्ज दाखल करण्याची व परवानगीची आवश्यकता नसल्याचे म्हणत अर्ज निकाली काढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यात गाजलेल्या या गुन्ह्णात आता लाचलुचपत प्रतिबंधक खाते काय चौकशी करते, याकडे साºयांचे लक्ष लागून आहे.