शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांविरोधात सरपंचांच्या तक्रारी

By admin | Updated: June 29, 2017 00:48 IST

नागरिक आणि पदाधिकारी यामधील समन्वयक म्हणून काम करून मानूर गट समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जि. प. सदस्य डॉ. भारती पवार यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व शासनाच्या विविध योजनेंतर्गत विविध विकासकामांना प्राधान्य देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करत नागरिक आणि पदाधिकारी यामधील समन्वयक म्हणून काम करून मानूर गट समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जि. प. सदस्य डॉ. भारती पवार यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना केले. पंचायत समिती सभागृहात मंगळवारी झालेल्या मानूर गटाच्या आढावा बैठकीप्रसंगी डॉ पवार बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, पंचायत समिती सदस्य मीनाक्षी चौरे, माजी सभापती ,अ‍ॅड. संजय पवार, प्रवीण पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत मानूर गटातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सरपंचांनी ग्रामसेवक विश्वासात न घेता काम करत असल्याची तक्रार करत ग्रामसेवकांच्या विरोधातच पाढा वाचला. यावेळी डॉ. भारती पवार यांनी प्रत्येक ग्रामपंचायतनुसार आढावा घेत ग्रामसेवक व सरपंचांकडून प्रत्येक गावात कुठले काम सुरू आहे व आगामी काळात कोणती कामे गरजेची आहेत याबाबत माहिती जाणून घेतली. सरपंचांनी कामाची माहिती द्यायची आणि ग्रामसेवकांनी कामांची आजची स्थिती, नवीन कामांसंदर्भात दाखल केलेले प्रस्ताव किंवा प्रस्ताव कधीपर्यंत तयार करून दाखल होतील याबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीस नारायण हिरे, बाळासाहेब पवार, संभाजी पवार, वाय. एस. देशमुख, अमित देवरे, प्रवीण रौंदळ, अमोल पगार, रुपेश शिरोरे, किरण पाटील आदींसह सरपंच व ग्रामसेवक आदींसह प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.