शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

मनातल्या गाण्यांची ‘सरीवर सर’!

By admin | Updated: November 9, 2015 00:37 IST

सलील-संदीप यांची मैफल रंगली

नाशिक : कधी ‘त्यांच्या’ मनातल्या, तर कधी रसिकांच्या मनातल्या गीतांची ‘सरीवर सर’ बरसत राहते... फर्माइशींचा सिलसिला सुरूच राहतो अन् या स्वरांच्या सरींत रसिक चिंब होत राहतात... दीपोत्सवाच्या या चैतन्यमय दिवसांत रसिकांच्या मनाचे कोपरेही या मैफलीमुळे मग उजळून निघतात...असाच काहीसा प्रत्यय ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या ‘मनातली गाणी’ मैफलीत आला. खास दिवाळीनिमित्त हा स्वरोत्सव साजरा करण्यात आला. डॉ. कुलकर्णी यांनी ‘जननी जिवलगे येई तो पांडुरंगे’ या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘सूरमयी श्याम इस तरह आए...’ ही गझल त्यांनी पेश केली. यावेळी याच अर्थाच्या आरती प्रभूंच्या ‘आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी’ या कवितेची आठवणही त्यांनी जागवली. पुढे ‘आयुष्यावर बोलू काही’मधली ‘सरीवर सर’सह अन्य बालगीते, प्रेमगीते सादर करीत कुलकर्णी-खरे जोडीने रसिकांची दाद घेतली. गायिका रागिणी कामतीकर यांनीही ‘केव्हा तरी पहाटे’, ‘ऐरणीच्या देवा’ ‘लख-लख चंदेरी’ ही गाणी गायली. ‘दिवा लागू दे रे देवा’ या गीताने मैफलीचा समारोप झाला. आदित्य आठल्ये (तबला), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज, ढोलकी), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड) यांनी संगीतसाथ केली. रसिकांच्या फर्माइशींमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची होती. ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या ३६ विद्यार्थिनींना आकाशकंदील देऊन कार्यक्रमाला आगळ्या पद्धतीने प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)