शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सत्तेतून शिवसेनेला बाजूला सारा

By admin | Updated: October 16, 2015 21:51 IST

चर्चा : सत्ताधारी सदस्यांमध्ये धुसफूस सुरूच

नाशिक : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये सुरू असलेली धुसफूस थेट माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत पोहोचल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी सेसचा निधी वाटप करताना त्याचे प्रमाण ७०-३० ठेवण्याची मागणी केल्याचे समजते. तसेच सत्तेच्या सारिपटातून शिवसेना व भाजपाला वगळण्याची कुरकुरही सुरू केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीने सत्तेची मोट बांधण्यासाठी भाजपा व शिवसेनेला सोबत घेत एकेक सभापती पद दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांमध्येच धुसफुस सुरू असून, त्याची परिणती म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कसमा पट्ट्यातील काही सदस्यांनी माजी उपमुख्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी (दि.१४) राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य व पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक ठेवली होती. या बैठकीत आमदार छगन भुजबळ यांनी सदस्यांची गाऱ्हाणे व तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर कारभार सुधारण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देतानाच अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनाही सदस्यांची कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावेळी अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी सदस्यांना विकासकामांचा खरोखरच कळवळा आहे काय? ते त्यांचा निधी अन्य गटांत चक्क विक्री करीत असल्याची बाब आमदार भुजबळांना सांगितले. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)लक्ष : राष्ट्रवादीचे नेते काय निर्णय घेतात ?राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी आता निधीचे समान वाटप नव्हे तर राष्ट्रवादीला ७० टक्के, तर उर्वरित निधी अन्य पक्षाला देण्याची मागणी केल्याचे समजते. इतकेच नव्हे तर सत्तेतून शिवसेनेला वगळण्याची मागणीही केल्याचे समजते. अर्थात शिवसेनेला वगळल्यास पुन्हा राष्ट्रवादीला नको असलेल्या कॉँग्रेससोबतच पुन्हा सत्तेचा संसार करण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका जानेवारी २०१७ मध्ये होत असल्याने त्यापूर्वी स्वबळाची चाचपणी करण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून आक्रमक पवित्रा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपाला सत्तेतून वगळण्याच्या सदस्यांनी केलेल्या मागणीचा आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ पातळीवरील नेते काय निर्णय घेतात? याकडे राष्ट्रवादीच्या सदस्यांचे लक्ष लागले आहे.