शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगीला अभिषेक

By admin | Updated: October 16, 2016 01:19 IST

कोजागरी उत्सव : कावडधारक नतमस्तक

सप्तशृंगीला अभिषेक कोजागरी उत्सव : कावडधारक नतमस्तकवणी : कोजागरी पौर्णिमेला सुमारे ७० हजार कावडधारक सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले. पदयात्रा करत आणलेल्या तीर्थाने सप्तशृंगीला अभिषेक करून पुढल्या वर्षी येण्याचे अभिवचन देत भावपूर्ण अंतकरणाने निरोप घेतला.अर्धेपीठ गणल्या जाणाऱ्या सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेला आज सकाळपासून कावडधारकांची मंदियाळी सुरू होती. महाराष्ट्रातील नंदुरबार, शहादा तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात राज्यातील कावडधारकांचा यात सहभाग होता. आज दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी कोजागरी पौर्णिमेस प्रारंभ झाल्यानंतर दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी कावडधारकांनी आलेले तीर्थ घेण्यास सुरुवात करण्यात आली. गडावर ४०० लिटर क्षमतेच्या २० स्टीलच्या पंचपात्र्यांमध्ये हे तीर्थ गोळा करण्यात आले. सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी तीर्थांच्या अभिषेकास प्रारंभ करण्यात आला. रात्री ११ वाजेपर्यंत हा विधी सुरू होता. तद्नंतर भगवतीचा सुवर्ण अलंकाराने साजशृंगार करून सजावट व सुशोभीकरण करण्यात आले. यानंतर न्यासाचे विश्वस्त नाना सूर्यवंशी यांच्या हस्ते सपत्नीक देवीची विशेष महापूजा व आरती करण्यात आली. भाविक व कावडधारकांना मोफत महाप्रसाद, पिण्याचे पाणी, आरोग्यसुविधा पोलीस बंदोबस्त, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण करण्याची प्रशासकीय यंत्रणा या सर्व बाबींची पूर्तता अग्रक्रमाने करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली. कोजागरी पौर्णिमेला सप्तशृंगीला अभिषेक घालण्याची कावडधारकांची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. गुजरातमधूनही कावडधारक गडावर दाखल झाले. (वार्ताहर)