नाशिक : देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या वणी येथील श्री सप्तश्रृंगी देवीचे मंदिर २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत बंद असणार आहे. दरड ढासळण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी कळसाच्या वरील भागात काम सुरू करण्यात आले असून त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गडावर प्रवेशाला मनाई करण्यात आली आहे.यासंदर्भात सप्तशृंगी देवी मंदिराच्या कळसाच्या भागात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी फ्लेक्झिबल बॅरिअरचे काम करण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या परिसरात जाळ्या बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. (प्रतिनिधी)
सप्तशृंगीदेवी मंदिर महिनाभर बंद
By admin | Updated: November 20, 2015 23:46 IST