शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सप्तश्रृंगी सह. सुतगिरणी संस्थेची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:50 IST

देवळा : सप्तश्रृंगी सहकारी सुतगिरणी मर्या. देवळा हया संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आल्यानंतर सदर सुतगिरणीच्या सभासदांना त्यांची रक्कम परत करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली असून भागधारकांना धनादेशांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देदेवळा : शेअर्सची रक्कम सभासदांना परत करण्याची प्रक्र ीया सुरू

देवळा : सप्तश्रृंगी सहकारी सुतगिरणी मर्या. देवळा हया संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आल्यानंतर सदर सुतगिरणीच्या सभासदांना त्यांची रक्कम परत करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली असून भागधारकांना धनादेशांचे वाटप करण्यात आले.१९९७ साली नियोजित सप्तश्रृंगी सहकारी सुतगिरणी मर्या. देवळा ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संस्थेचे सभासदत्व घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी संस्थेचे शेअर्सपोटी रक्कम जमा केली व ते संस्थेचे सभासद झाले होते. मात्र हि सुतगिरणी अस्तित्वात आली नाही. कालांतराने सुतगिरणीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येवून त्यावर प्रशासक नेमण्यात आले. नंतर हि संस्था अवसायानात निघाली. देवळयाचे सहाय्यक निबंधक संजय गीते यांची अवसायक म्हणून सुतगिरणीवर नेमणुक झाली. सुतगिरणीची नोंदणी रद्द झालेली नसल्यामुळे सभासदांची शेअर्सची रक्कम अडकून पडली होती. अडकलेली हि रक्कम त्यांना परत मिळावी यासाठी सभासदांनी सातत्याने प्रयत्न केले, अखेर अवसायानात निघालेल्या या सुतगिरणीची नोंदणी रद्द करण्याचे आदेश संचालक वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन नागपूर यांनी दिल्यानंतर सभासदांची शेअर्सची रक्कम परत मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला होता.देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे अध्यक्ष केदा अहेर, सहाय्यक निबंधक संजय गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत सुतगिरणीच्या भागधारकांना धनादेशांचे वाटप करण्यात आले. कौतिक हिरे, सतिश राणे, निंबाजी अहेर, जिभाऊ वाघ, रामदास कानडे आदी दहा सभासदांना धनादेश देवून शेअर्स परत करण्याचा शुभारंभ करण्यात आला.सभासदांनी विहीत नमुन्यातील अर्जासोबत शेअर्स पावती, आधार कार्ड व रेशनकार्डची छायांकित प्रत, तसेच दोन पासपोर्ट साईज फोटो जोडावेत. सभासद मयत असल्यास न्यायालयाचा किंवा तहसिलदारांचा वारस दाखला जोडणे आवश्यक आहे. सुतगिरणीच्या सभासदांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अवसायक तथा सहाय्यक निबंधक संजय गीते यांनी केले आहे.