शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे सप्तशृंगी मंदिर संरक्षक जाळ्यांमुळे बचावले : दरड कोसळली

By admin | Updated: June 12, 2017 20:13 IST

साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणीमधील श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर आज पावणेपाच वाजेच्या सुुमारास डोंगरावरील दोन मोठे दगड कोसळले

नाशिक : साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणीमधील श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर आज पावणेपाच वाजेच्या सुुमारास डोंगरावरील दोन मोठे दगड कोसळले; मात्र सुदैवाने मंदिरावरील बाजूने डोंगराला लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीमध्ये हे दगड अडकल्याने मंदीरासह भाविकही सुरक्षित राहिले.मंदिराच्या व भाविकांच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक जाळ्या डोंगराच्या कपारीमध्ये बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन मोठे दगड संध्याकाळच्या सुमारास डोंगरमाथ्यावरून कोसळले. सुदैवाने जाळ्यांमध्ये हे दगड अडकले व जाळ्यादेखील दगडांच्या वजनाने तुटल्या नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा दगड मंदिरावर कोसळण्याचा धोका होता. अंदाजे एक दगड पाचशे ते सहाशे किलो वजनाचा आहे. सप्तशृंगगडावर दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे दरड कोसळली. परंतु संरक्षक झाळी असल्यामुळे मंदिरासह भाविक सुरक्षित राहिले. ज्यावेळी दरड कोसळली तेव्हा मंदिंरात भाविकांची संख्या कमी होती असे व्यवस्थापकीय सुत्रांनी सांगितले. दरड कोसळल्याने मोठा आवाज झाला व एकच गोंधळ उडून धावपळ झाली. भाविकांसह परिसरातील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली. सर्वांनी धाव घेत मंदिराच्या बाहेर येऊन डोंगरावर नजर टाकली असता जाळ्यांमध्ये दोन दगड अडक ल्याचे दिसले आणि उपस्थितांचा जीव भांड्यात पडला.