शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नीलम गोऱ्हे यांना सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार

By admin | Updated: March 25, 2017 00:51 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालय, या संस्थेतर्फे देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार आमदार नीलम गोऱ्हे यांना जाहीर झाल्याची माहिती काळजीवाहू अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी दिली.

नाशिक : सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार यावर्षी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांना जाहीर झाल्याची माहिती सार्वजनिक वाचनालयाचे काळजीवाहू अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी दिली.सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुका झाल्यानंतर एप्रिल महिन्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, पन्नास हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्षम आमदार पुरस्कारासाठी निवड करण्यात येणाऱ्या समितीत सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह कर्नल आनंद देशपांडे, आमदार प्रतिनिधी हेमंत टक ले, शैलेंद्र तनपुरे आदिंचा समावेश आहे. माजी आमदार आणि पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या डॉ. शोभा नेर्लीकर आणि डॉ. विनायक नेर्लीकर यांनी सार्वजनिक वाचनालयाला दिलेल्या देणगीच्या व्याजातून हा पुरस्कार देण्यात येतो.  महानगरपालिकेची निवडणूक आणि विधानसभेचे अधिवेशन तसेच आता सुरू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे औरंगाबादकर यांनी सांगितले. सन २००३ पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्र मात आतापर्यंत बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभा फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश पाटील, भाऊसाहेब फुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात आणि बच्चू कडू यांना सन्मानित करण्यात आले आहे.