शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाºयांची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:54 IST

सुमारे साडेतीन ते चार लाख लोकसंख्या असलेल्या सिडको विभागाच्या स्वच्छतेसाठी सुमारे चारशेहून अधिक कर्मचारी संख्या असणे गरजेचे असताना गेल्या अनेक वर्षांपासून ही जबाबदारी अवघ्या ११० सफाई कर्मचाºयांकडून करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाºयांना कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

सिडको : सुमारे साडेतीन ते चार लाख लोकसंख्या असलेल्या सिडको विभागाच्या स्वच्छतेसाठी सुमारे चारशेहून अधिक कर्मचारी संख्या असणे गरजेचे असताना गेल्या अनेक वर्षांपासून ही जबाबदारी अवघ्या ११० सफाई कर्मचाºयांकडून करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाºयांना कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सिडको प्रभागात सहा प्रभागांचा समावेश असून, एकूण २४ नगरसेवक आहेत . सिडको प्रभागात जुने सिडको, नवीन सिडको, अश्विननगर, खुटवडनगर, तिडकेनगर, अभियंतानगर, अंबड औद्योगिक वसाहत, पाथर्डी फाटा परिसरासह मोठा भाग येत असून, कामकाज करण्यासाठी सुमारे चारशेहून अधिक कर्मचारी असणे गरजेचे आहे. परंतु सध्या सिडकोवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाकडे केवळ ११० कर्मचारी आहेत. यातच कर्मचाºयांची साप्ताहिक सुटी, आजारपण यात काही कर्मचारी गैरहजर राहतात. यामुळे कमी कर्मचाºयांकडून संपूर्ण सिडकोची साफसफाई करणे जिकिरीचे होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.काही दिवसांपूर्वी सिडकोसह परिसरात स्वाइन फ्लू या आजाराने डोके वर काढले होते, परंतु यानंतरही कर्मचारीसंख्या वाढविण्यात आलेली नाही, अपुºया कर्मचाºयांमुळे कामकाज करताना कर्मचाºयांप्रमाणेच अधिकाºयांचीदेखील तारांबळ उडते. त्यामुळे अनेकदा कर्मचारी हे दैनदिन कामकाज करताना आज एका भागाची तर उद्या दुसºया भागात जाऊन सफाई करताना दिसतात. यामुळे परिसरात व्यवस्थित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरते. तसेच यामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढलेले असून, याबाबत मनपाने दखल घेत सिडको विभागात सफाई कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची गरज आहे.मुकादमांची संख्या केवळ दोनचसिडको विभागासाठी सफाई कर्मचारी संख्या कमी आहे, त्याप्रमाणे कर्मचाºयांकडून कामकाज करून घेणाºया मुकादमांची संख्यादेखील कमीच आहे. सिडको विभागासाठी सध्या फक्त दोनच मुकादम असून, त्यांची संख्यादेखील १२ ते १५ असणे गरजेचे आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यातसिडको विभागात कर्मचारी संख्या वाढविण्यात यावे याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी आवाज उठवितात. काही दिवसांपूर्वीच प्रभाग २४ मध्ये कर्मचारी संख्या वाढवावी यासाठी शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी याआधी मनपा आयुक्तांनाही निवेदन दिले आहे. परंतु अद्यापही सिडकोकडे मनपा अधिकाºयांकडून लक्ष दिले जात नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे साहजिकच परिसरात ठिकठिकाणी घाण व कचरा साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.