शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

संत नामदेव स्मारकाचा पंढरपूर विकास आराखड्यात समावेश

By admin | Updated: June 1, 2014 01:16 IST

भुजबळ : नामदेव समाजोन्नती परिषद अधिवेशनास प्रारंभ

भुजबळ : नामदेव समाजोन्नती परिषद अधिवेशनास प्रारंभ नाशिक : संत नामदेव हे केवळ शिंपी समाजाचे संत नाहीत तर ते अखिल भारतीय संत आहेत़ त्यांचे भागवत व मानवता धर्माच्या प्रसाराचे कार्य महान आहे़ पंढरपूर शहर विकासासाठी शासनाच्या वतीने ३५० कोटींचा आराखडा तयार केला असून, या आराखड्यात संत नामदेव यांच्या स्मारक ाचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिले़तुपसाखरे लॉन्स येथे नामदेव समाजोन्नती परिषदेचे ५३वे अधिवेशन व वधू-वर पालक परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ भुजबळ म्हणाले, संत नामदेव सर्वांमध्ये पुजनीय आहेत़ त्यांचे स्मारक व्हावे यासाठी शासन पुढाकार घेऊन लवकरच मार्ग काढेल़ जगाची अब्रू झाकणारा शिंपी समाज कापडाच्या तुकड्यांप्रमाणे अनेक पोटजातीत विखुरला आहे़ यामुळे आरक्षणाचे लाभ मिळताना अडचणी येत असतात़ ओबीसीमध्ये समावेश असलेल्या सर्व जातींनी आपल्या पोटजाती संपवून एक होण्याची गरज आहे़ ओबीसी सक्षम केली तरच सर्वांना लाभ होणार आहे़ राजकारण करणे सोपे आहे़ परंतु समाजकारण करताना अनेक अडचणी येतात़ प्रत्येकाने समाजाच्या विकासासाठी काम करावे; परंतु आपण ओबीसी आहोत याचा विसर मात्र पडता कामा नये़ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महाराष्ट्राबाहेर जाऊन भागवत धर्माचा प्रचार करणारे नामदेव हे एकमेव संत आहेत़ केवळ भागवत धर्माचा प्रचार न करता पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी जगाला दिला आहे़ तोच वारसा शिंपी समाजाने पुढे चालवावा़ अधिवेशनाच्या माध्यमातून तरुणांचेही संघटन करून नवनव्या संधींची माहिती त्यांना देऊन विकास साधणे आवश्यक आहे़ प्रास्ताविक करताना परिषदेचे अध्यक्ष ॲड़ मधुकर पिसे म्हणाले, नामदेव शिंपी समाजाला ओबीसींच्या सवलती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद येत्या अधिवेशनात करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली़ याप्रसंगी नामदेव समाजोन्नती परिषदेचे उपाध्यक्ष संजीव तुपसाखरे, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य हरी नरके, राजन उरणकर, एल़ जी़ दाभोळ, उद्योजक रवि बारटक्के, नानासाहेब निकुंभ, संजय भावसार, शोभा कर्‍हाडकर, सरोज उरणकर, वृषाली तुपसाखरे, अनंत वायचळ, अरुण लचके आदि उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल गिते यांनी केले़ आभार रत्नाकर लुंगे यांनी मानले़