शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरट्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 01:25 IST

मालेगाव : शहर परिसरातून सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील एका भामट्याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ४० हजार किमतीची ३ मंगळसूत्रे हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मालेगाव : शहर परिसरातून सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील एका भामट्याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूरयेथून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ४० हजार किमतीची ३ मंगळसूत्रे हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.शहरातील कॅम्प भागातून वेगवेगळ्या चार घटनांमध्ये सोनसाखळी चोरांनी मंगळसूत्र लंपास केल्याचे प्रकार घडले होते.या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या सोनसाखळी चोरट्यांचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना संशयित आरोपी श्रीरामपूर इराणी वसाहत येथील कासीम ऊर्फ कासम गरीबशाह (वय ३०) याचा हात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपी कासीम याच्याकडून एकूण तीन मंगळसूत्र हस्तगत करण्यात आली तर अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पत्रकार परिषदेस उपअधीक्षक अजित हगवणे, कॅम्पचे पोलीस निरीक्षक भवारी उपस्थित होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करपे, निरीक्षक भवारी व पथकाने श्रीरामपूर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून दि. २० जून रोजी संशयित कासीम इराणी यास अटक केली. त्याची चौकशी केली असता कासीम शाह व त्याचा साथीदार अब्बास असलम जैदी यांनी चार ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.