शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

संजीवन समाधी सोहळा : ज्ञानेश्वरी पारायण, महाआरती संत ज्ञानेश्वर पालखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:56 IST

आकर्षक सजावट केलेले संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, माउलींचा जयघोष करणारे आबालवृद्ध भाविक, मंदिर परिसरात काढण्यात आलेली पालखी मिरवणूक, जागोजागी रांगोळ्यांसह औक्षण, फुले, प्रसाद अर्पण करीत होत असलेले स्वागत, कीर्तन, भजन, आरती, महाप्रसाद, सतारवादन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन अशा अपार उत्साहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा पार पडला.

ठळक मुद्देभाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीदिवसभर महाप्रसादाचे आयोजनहजारो भाविकांनी मंदिरास भेट

नाशिक : आकर्षक सजावट केलेले संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, माउलींचा जयघोष करणारे आबालवृद्ध भाविक, मंदिर परिसरात काढण्यात आलेली पालखी मिरवणूक, जागोजागी रांगोळ्यांसह औक्षण, फुले, प्रसाद अर्पण करीत होत असलेले स्वागत, कीर्तन, भजन, आरती, महाप्रसाद, सतारवादन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन अशा अपार उत्साहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा पार पडला.हुंडीवाला लेन येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात गुरुवारी (दि.१६) सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता करण्यात आली. ९ वाजता हुंडीवाला लेन येथून दहीपूल, नेहरू चौक, सोमवार पेठ, भद्रकाली कारंजा हुंडीवाला लेन या मार्गे माउलींच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. सर्व वारकरी भजनी मंडळांनी समाधी सोहळ्याच्या अभंगांचे गायन केले. दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महिला भजनी मंडळाने गीतापाठ सादर केला. सायंकाळी डॉ. श्रीकृष्णबुवा सिन्नरकर यांचे ‘ज्ञानेश्वर महाराज समाधी व संतचरित्र’ विषयावर कीर्तन झाले. रात्री शाहीर परवेझ संगीत गुरुकुलच्या सदस्यांनी सतारवादन करीत सोहळ्यात मंगलमय असा अनोखा रंग भरण्याचा प्रयत्न केला. नीलेश शौचे, मंदार देव, सुधाकर गर्गे यांनी पूजन केले. दिवसभरात नगरसेवक शाहू खैरे, गुरुमित बग्गा आदी विविध मान्यवरांसह हजारो भाविकांनी मंदिरास भेट देत दर्शन घेतले.