शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

तीर्थक्षेत्र कमिटीच्या राज्य अध्यक्षपदी संजय पापडीवाल यांची अविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 7:33 PM

सटाणा : पैठण येथील दिगम्बर जैन अतिशय क्षेत्र येथे झालेल्या भारतवर्षीय दिगंबर जैन तीथक्षेत्र कमिटीच्या पंचवार्षिक सभेमध्ये महाराष्ट्र अंचल अध्यक्षपदी बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील १०८ फुट मुर्ती निर्माण समितीचे महामंत्री व सम्मेदशिखरजी, गजपंथाचे विश्वस्त संजय पापडीवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे ही संस्था १३० वर्ष जुनी असुन संस्थेचे राष्ट्रीय कार्यालय मुंबई येथे आहे.

सटाणा : पैठण येथील दिगम्बर जैन अतिशय क्षेत्र येथे झालेल्या भारतवर्षीय दिगंबर जैन तीथक्षेत्र कमिटीच्या पंचवार्षिक सभेमध्ये महाराष्ट्र अंचल अध्यक्षपदी बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील १०८ फुट मुर्ती निर्माण समितीचे महामंत्री व सम्मेदशिखरजी, गजपंथाचे विश्वस्त संजय पापडीवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.ही घोषणा निवडणुक पर्यवेक्षक व मुंबई येथील संस्थेचे राष्ट्रीय विश्वस्त डी. यु. जैन यांनी केली. संस्थेद्वारे संपूर्ण भारतभर असलेल्या दिगंबर जैन तीर्थक्षेत्रांच्या संरक्षण, संवर्धन व विकासासाठी कार्य केले जाते. ही संस्था १३० वर्ष जुनी असुन संस्थेचे राष्ट्रीय कार्यालय मुंबई येथे आहे.संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा राष्ट्रीय समितीद्वारे करण्यात आली होती. त्यासाठी १३ जुन पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. राज्यभरातून संजय पापडीवाल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेची पंचवार्षिक सभा रविवारी (दि.२३) पैठण येथे झाली.या सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री संतोष पेंढारी (नागपुर), राष्ट्रीय मंत्री निलम अजमेरा (उस्मानाबाद), मावळते अध्यक्ष प्रमोद कासलीवाल, सोलापूरचे अनिल जमगे, संस्थेचे पूर्व अध्यक्ष डॉ. पन्नालाल पापडीवाल तसेच अतिथी म्हणुन औरंगाबादचे अध्यक्ष ललीत पाटणी, मांगीतुंगीचे जीवन प्रकाश जैन, कचनेरचे महामंत्री भरत ठोले, पैठणचे अध्यक्ष महावीर बडजाते, विलास पहाडे, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मराठवाडा केमिस्ट असोसिएशनचे सचिव विनोद लोहाडे आदि उपस्थित होते.संस्थेचे सचिव देवेंद्र काला यांनी संस्थेचे इतिवृत्त वाचुन दाखविले.संस्थेचे अध्यक्ष प्रमोद कासलीवाल यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच नुतन अध्यक्ष पापडीवाल यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संजय पापडीवाल यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे याची औपचारिक घोषणा करण्यात आली.या सभेमध्ये गजपंथा, कचनेर, पैठण, णमोकार तीर्थ, ऋ षिभगरी, चंद्रगिरी, धर्मतीर्थ, जटवाडा, पंचलेश्वर, ज्ञानतीर्थ शिर्डी, कुन्थुगिरी तीर्थ, आदि तीर्थक्षेत्रांचे विश्वस्त उपस्थित होते.यावेळी नुतन अध्यक्ष संजय पापडीवाल, पैठणचे आमदार संदीपान भूमरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, नगरसेवक तुषार पाटील, ईश्वर दगडे, भूषण कावसंकर आदींनी मनोगत व्यक्त केले.(फोटो २६ संजय पापडीवाल)