शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महिलांमुळे समाजव्यवस्था टिकून संजय दराडे : मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:11 IST

मालेगाव : महिलांमुळेच देशातील समाजव्यवस्था टिकून आहे. महिला घर, कुटुंब योग्य पद्धतीने सांभाळीत असल्यामुळे पुरुष मंडळीला घराबाहेर पडता येते.

ठळक मुद्देमॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्ह व टी-शर्टच्या अनावरण कार्यक्रममहिला धावपटूंच्या हस्ते टी-शर्टचे प्रदर्शन

मालेगाव : महिलांमुळेच देशातील समाजव्यवस्था टिकून आहे. महिला घर, कुटुंब योग्य पद्धतीने सांभाळीत असल्यामुळे पुरुष मंडळीला घराबाहेर पडता येते. देश घडविण्यासाठी महिलांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी केले.महिला दिनाचे औचित्य साधून येत्या ११ मार्च रोजी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस व मालेगाव शांतता समितीच्या संयुक्त विद्यमाने होणाºया मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्ह व टी-शर्टच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, डॉ. फातीमा, डॉ. समीना, प्रभारी वरिष्ठ अधिकारी एन. सूर्यवंशी उपस्थित होते. जिल्हा पोलीस प्रमुख दराडे पुढे म्हणाले की, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सक्षम आहे. यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. मालेगाव शहरातील नागरिकांचा उत्साह बघून रन फॉर युनिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदृढ व सुरक्षित मालेगाव शहरासाठी ११ मार्च रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शहरवासीयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी तहसीलदार देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. हेमांगी वाव्हळ, डॉ. समीर पाटील, डॉ. अक्षय मेहता यांनी आरोग्याविषयी माहिती दिली. यापूर्वी वृद्ध धावपटू काशीनाथ कापडणीस, द्वारकादास तापडिया, डॉ. शशिकांत वाव्हळ, डॉ. दत्तात्रय पाटील यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच धावपटू अंजली गायकवाड, वैशाली शेलार व इतर महिला धावपटूंच्या हस्ते टी-शर्टचे प्रदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमात अमित कुलकर्णी यांनी शहरातील राष्टÑीय एकात्मतेवर बंधूभावचा संदेश देणारा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दलाने बनविलेल्या महिला सुरक्षिततेसाठीचा व्हिडीओ दाखविण्यात आला. १०९१ हा हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक, महिला, पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पिंकी मेहता यांनी केले. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी आभार मानले.