लोकमत न्युज नेटवर्कवटार : कोरोना सारख्या महाभयानक संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण गावात ट्रॅक्टरने सॅनीटायझरची फवारणी केली जात आहे. तसेच ध्वनिक्षेपाद्वारे कोरोना संदर्भात काळजी घेण्याकरीता आवश्यक त्या उपाय योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे.गावाला कोरोनापासून सुरक्षीत राहण्यासाठी कीटकनाशक फवारणी, तणनाशक व धुराळा फवारणी करून जनतेच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतेने लक्ष केंद्रीत केले आहे.सरपंच कल्पना खैरनार, उपसरपंच जितेंद्र शिंदे, जिभाऊ खैरनार ग्रामसेवक वसंत भामरे, राजेंद्र खैरनार, हरीचंद्र अिहरे, प्रकाश बागुल, दशरथ खैरनार, दादाजी खैरनार, देवमान माळी आदींच्या उपस्थितीत औषध फवारणी करण्यात येत आहे.ग्रामस्थांनी घरातच राहणे, साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, यासह अनेक सूचना ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहेत. गावातील सर्व व्यापारी बांधव गर्दी होणार नाही याची दक्षता घेत ग्राहकांना माल देत आहेत.कोट...पावसाळ्याचे दिवस व कोरोनाचा खेड्यांमध्ये होणारा वाढता फैलाव पाहता आता प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही गावपातळीवर कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करत आहोत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. स्वताच्या घरात थांबा व सुरक्षित रहा. पुढचे काही दिवस स्वतला बंदिस्त करा.- कल्पना खैरनार, सरपंच, वटार.(फोटो ०९ वटार)
वटार गावात सॅनीटायझरची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 18:36 IST
वटार : कोरोना सारख्या महाभयानक संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण गावात ट्रॅक्टरने सॅनीटायझरची फवारणी केली जात आहे. तसेच ध्वनिक्षेपाद्वारे कोरोना संदर्भात काळजी घेण्याकरीता आवश्यक त्या उपाय योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
वटार गावात सॅनीटायझरची फवारणी
ठळक मुद्देजनतेच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतेने लक्ष केंद्रीत केले आहे