शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता सर्वेक्षण जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:46 IST

स्वच्छता अभियानाबाबत जनमानसात जनजागृती करून पारंपरिक सवयींबाबत परिवर्तन करणे आवश्यक आहे. शौचालयाचा वापर वाढवून उघड्यावरील हगणदारी पूर्णपणे बंद करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, चित्ररथाद्वारे जास्तीत जास्त गावात जनजागृती करून स्वच्छतेचा संदेश तळागाळात पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले आहे.

नाशिक : स्वच्छता अभियानाबाबत जनमानसात जनजागृती करून पारंपरिक सवयींबाबत परिवर्तन करणे आवश्यक आहे. शौचालयाचा वापर वाढवून उघड्यावरील हगणदारी पूर्णपणे बंद करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, चित्ररथाद्वारे जास्तीत जास्त गावात जनजागृती करून स्वच्छतेचा संदेश तळागाळात पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ च्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या एल.ई.डी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, बांधकाम सभापती मनीषा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी. एस तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बावके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना शीतल सांगळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कार्यशाळा विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच चित्ररथाद्वारे होणाऱ्या जनजागृतीमध्ये ग्रामस्थ, महिला, शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्याला चांगले मानांकन मिळविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांनी चित्ररथाबाबत माहिती दिली. सदरचा चित्ररथ हा नाशिक जिल्ह्यातील ७३ गावांमध्ये जनजागृतीसाठी जाणार असून, स्वच्छतेचे विविध संदेश, चित्रफीत याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यात येणार आहे, तसेच मोबाइल अपद्वारे गावातील स्वच्छतेच्या सद्यस्थितीतील प्रतिक्रिया नोंदवण्यात येणार आहे. प्रतिक्रिया केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर जाणार असून, जास्तीत जास्त प्रतिक्रियेद्वारे राज्यासह जिल्ह्याचे मानांकन ठरणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदShital Sangaleशितल सांगळे