नाशिक : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) मार्फत १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीदरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे. या निमित्ताने बीवायके महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये महाविद्यालयीन परिसर स्वच्छता, जनजागृती अभियान, वैयक्तिक स्वच्छता, पोस्टर मेकिंग इत्यादी उपक्रम घेण्यात आले. यावेळी बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. हा उपक्रम महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत कमांडिंग ऑफिस कर्नल ए.के. सिंग, प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट देवेंद्र भवारी, एनएसएस अधिकारी डॉ. हरी वंगरवार व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. पंकज बावणे यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
बीवायके महाविद्यालयात झाले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:30 IST