शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

लासलगाव येथे स्वच्छता अभियान

By admin | Updated: January 25, 2016 22:51 IST

लासलगाव येथे स्वच्छता अभियान

लासलगाव : घराबरोबरच गाव स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे लासलगाव सुंदर होण्यासाठी लोकांनी घंटागाडीत कचरा टाकून सहकार्य करावे, तसेच उपाहारगृह चालकांनी कचरा संकलित करून तो घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर यांनी केले.रविवारी सकाळी स्वच्छ आणि सुंदर लासलगाव व पिंपळगाव नजीक या दोन गावांकरिता दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छतादूत व लासलगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी लासलगाव व पिंपळगाव नजीक येथे स्वच्छता अभियान राबविले. लासलगाव येथील शिवाजी चौकात सकाळी सरपंच संगीता शेजवळ, उपसरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपसरपंच जयदत्त होळकर, सुलेमान मुलाण, डॉ. विजय बागरेचा, पोलीस निरीक्षक नवले, राजेंद्र चाफेकर यांच्या भाषणानंतर लासलगाव येथील सहा प्रभागांतील दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छतादूत, लासलगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ केले. गोकुळ पाटील यांनी यापूर्वी स्वच्छता अभियान राबविले होते. दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे ३६३ स्वच्छतादूत, १८९ ग्रामस्थ व ३६० महाविद्यालयीन युवक- युवती या अभियानात सहभागी झाले. लासलगाव व पिंपळगाव नजीक येथील २४.५ किलोमीटर रस्त्यावर साफसफाई करण्यात आली. ८ हजार ४५० चौरस मीटर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. १८ हजार ५१६ किलो कचरा जमा केला गेला. गोकुळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. विकास कोल्हे यांनी आभार मानले. (वार्ताहर)