लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : महानगरपालिकेच्या आयुक्तपदी संगीता धायगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात धायगुडे पदभार स्वीकारणार आहेत.मनपाचे आयुक्त रवींद्र जगताप यांची गेल्या महिनाभरापूर्वीच बदली झाली होती. मात्र महापालिका निवडणुकीमुळे त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. निवडणुकीनंतर शासनाने सध्या धुळे येथील मनपा आयुक्त धायगुडे यांची मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक केली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तपदी एखाद्या महिलेची नियुक्ती झाली आहे. धायगुडे या पदभार स्वीकारणार आहेत. त्यांनी यापूर्वी रायगड जिल्हा प्रकल्प अधिकारी व धुळे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
मालेगाव मनपा आयुक्तपदी संगीता धायगुडे
By admin | Updated: June 2, 2017 01:06 IST