शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तोतया दिग्दर्शक ‘सॅन्डी’चा सिनेस्टाइल पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:45 IST

चित्रपट महामंडळाचा सदस्य असल्याचे बतावणी करत जाहिराती व चित्रपटात ‘रोल’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महागड्या हॉटेलमध्ये तरुण-तरुणींना फोटोसेशन करणाºया तोतया निर्माता-दिग्दर्शकाचा बुरखा अखेर नाशिकच्या अस्सल कलावंतांनी फाडला. पांडवलेणी-घोटी असा सिनेस्टाइल पाठलाग करत पकडून पोलिसांच्या हवाली केले. पुणे पोलिसांचे गुन्हे शोध पथक तोतया दिग्दर्शक ‘सॅन्डी’च्या मागावर होते; मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.

नाशिक : चित्रपट महामंडळाचा सदस्य असल्याचे बतावणी करत जाहिराती व चित्रपटात ‘रोल’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महागड्या हॉटेलमध्ये तरुण-तरुणींना फोटोसेशन करणाºया तोतया निर्माता-दिग्दर्शकाचा बुरखा अखेर नाशिकच्या अस्सल कलावंतांनी फाडला. पांडवलेणी-घोटी असा सिनेस्टाइल पाठलाग करत पकडून पोलिसांच्या हवाली केले. पुणे पोलिसांचे गुन्हे शोध पथक तोतया दिग्दर्शक ‘सॅन्डी’च्या मागावर होते; मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.  मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील रहिवासी असलेला संदीप व्हरांबळे ऊर्फ सॅन्डी पाटील(३२) मागील काही वर्षांपासून ‘पोर्टफोलिओ’ तयार करून देण्याच्या नावाखाली चंदेरी दुनियेची भुरळ असलेल्या तरुण-तरुणींना गंडा घालण्याचा ‘उद्योग’ करत होता. मॉडेलिंगची आवड ठेवणाºया मुला-मुलींसह मॉडेलिंग फोटोग्राफी करणाºया छायाचित्रकारांचे संपर्क क्र मांक इंटरनेटच्या माध्यमातून मिळवून त्यांना आमिष दाखवत त्यांच्याकडून चित्रपट महामंडळाचे कार्ड देण्याच्या बहाण्याने शुल्काच्या नावाखाली रक्कम घेऊन पसार होत होता. शिर्डीच्या हॉटेलमध्ये आश्रय घेऊन त्याने मुंबईच्या दोन महिला कलावंतांना शिर्डीला शूटिंगसाठी बोलविले. मुंबईच्या मेकअप आर्टिस्ट व कोपरगावच्या एका प्रोफेशनल कॅमेरामनलाही त्याने गाठले. दोन दिवस शिर्डीच्या परिसरात शूटिंग केले यावेळी भाडोत्री इनोव्हा कारचा वापर केला; मध्यरात्री अचानकपणे त्याने शिर्डीमधील हॉटेल सोडले.‘व्हॉट््स अ‍ॅप’वरून फिरली सूत्रेसुयोगने सदर बाब शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. शिंदे यांनी त्या भामट्याचे छायाचित्र कलावंतांच्या व्हॉट््स अ‍ॅप ग्रुपमध्ये पोस्ट केले. त्यानंतर नाशिकचे श्याम लोंढे यांनी याबाबत सूत्रे हलविली. ज्या गाडीने सॅन्डीने पळ काढला ती गाडी ओळखीची असल्यामुळे गाडीमध्ये असलेल्या जीपीआरएसवरून गाडी मुंबईमध्ये नसून ती नाशिकच्या पांडवलेणीत असल्याचे समजले. त्यानंतर लोंढे, रफिक सय्यद, रवि जन्नावर, मयूर रोहम आदींनी पांडवलेणी गाठले. यावेळी सॅन्डीने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तेथून पळ काढत महामार्गावरून काळी-पिवळी मारुतीने घोटी गाठले. घोटीमधील एका एटीएमच्या बाहेर त्यांना सॅन्डी मिळून आला.