शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या उद्यानातून ३ चंदनाच्या झाडांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 17:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : एरवी सर्वसामान्य नागरीकांच्या वस्तूंची चोरी करणाºया भुरटया चोरटयांनी आता तर थेट महापालिकेच्या मालमत्तेवर वक्रदृष्टी फिरविली असुन चोरटयांनी मखमलाबाद येथिल महापालिकेच्या मानकर उद्यानातून पहाटेच्या सुमाराला तीन चंदनाची झाडे कटरच्या सहाय्याने तोडत चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी राहूल खांदवे यांनी म्हसरूळ पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : एरवी सर्वसामान्य नागरीकांच्या वस्तूंची चोरी करणाºया भुरटया चोरटयांनी आता तर थेट महापालिकेच्या मालमत्तेवर वक्रदृष्टी फिरविली असुन चोरटयांनी मखमलाबाद येथिल महापालिकेच्या मानकर उद्यानातून पहाटेच्या सुमाराला तीन चंदनाची झाडे कटरच्या सहाय्याने तोडत चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी राहूल खांदवे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत माहीती अशी की, मखमलाबाद शिवारात महापालिकेचे मानकर उद्यान असुन या उद्यानात प्रशासनाने काही दिवसांपुर्वी चंदनाची झाडे लावलेली होती. बुधवारी (दि. २६) पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरटयांनी उद्यानात प्रवेश करून तीन झाडे बुंध्यापासून कापून नेत चोरी केली आहे. सकाळच्या सुमाराला काही नागरीक उद्यानात गेल्यानंतर झाडे चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी प्रभागाचे नगरसेवक पुंडलिक खोडे यांना माहीती कळविली. या घटनेनंतर मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी राहूल खांदवे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून चंदनाची झाडे चोरून नेल्याबाबत म्हसरूळ पोलीसात धाव घेतली होती.परिसरात दाट लोकवस्ती असतांना चोरटयांनी मनपाच्या उद्यानात जाऊन चंदनाची झाडे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागरीकांत भितीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे या भागात म्हसरूळ पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांची रात्र गस्त नियमित होत नसल्याने भुरटया चोरटयांना वाव मिळत असल्याची तक्रार परिसरातील नागरीकांनी केली आहे. इतरवेळी नागरीकांच्या वस्तू चोरणाºया चोरटयांनी आता तर थेट मनपाच्या मालमत्तेची चोरी केल्याने खळबळ उडाली आहे.