शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साइटवरील वाळूचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:21 IST

जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील वाळू ठिय्यांचे अद्याप लिलाव झालेले नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून, या बांधकामासाठी वाळू व खडी कोठून आणली गेली, असा प्रश्न पडलेल्या नाशिक तहसील कार्यालयाने नाशिक शहरासह तालुक्यातील सर्वच बांधकाम ठिकाणांना भेटी देऊन तेथील खडी व वाळूचे पंचनामे करून संबंधिताना दंडाच्या नोटिसा बजावल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील वाळू ठिय्यांचे अद्याप लिलाव झालेले नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून, या बांधकामासाठी वाळू व खडी कोठून आणली गेली, असा प्रश्न पडलेल्या नाशिक तहसील कार्यालयाने नाशिक शहरासह तालुक्यातील सर्वच बांधकाम ठिकाणांना भेटी देऊन तेथील खडी व वाळूचे पंचनामे करून संबंधिताना दंडाच्या नोटिसा बजावल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रकल्पांचा शुभारंभ करण्याची तयारी केली जात असल्याने प्रशासनाच्या या नोटिसांमुळे नवीन कामांना खीळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  चार महिन्यांपूर्वी नाशिकच्या प्रांत अधिकाºयांनी पेठेनगर येथे वाळूच्या वाहनांवर मोठी कारवाई केली, परंतु वाळू वाहतूकदारांनी त्या विरुद्ध अपील दाखल केल्याने दंडात्मक कारवाईतून सदरची वाळू जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.पाचपट दंडाच्या नोटिसावाळू व खडीचा साठा करणाºयांकडे तहसील कार्यालयाने ते खरेदी केल्याच्या पावत्याही मागितल्या असून, त्या न दिल्याने आता उपलब्ध साठ्यावर पाच पट दंड आकारणीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. येत्या सात दिवसांत खुलासा न केल्यास दंड वसुलीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांची धावपळ उडाली आहे. मात्र असाच प्रकार कळवणच्या तत्कालीन प्रांत अधिकाºयांनी कळवण शहरात केला असता प्रकरण त्यांच्या अंगलट आल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती. मुळात नाशिक विभागात अद्याप एकाही जिल्ह्यातील वाळू ठिय्यांचा लिलाव झालेला नसतानाही नवीन बांधकामांसाठी वाळू कोठून उपलब्ध झाली याचे कोडे पडलेल्या नाशिक तहसील कार्यालयाने शहर व परिसर पिंजून काढत नवीन बांधकामे शोधली. या बांधकामांवर असलेली खडी, वाळू याबाबत त्यांनी संबंधिताना विचारणा केली, परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. शहरातील पाथर्डी, मखमलाबाद, गंगापूररोड, पंचवटी, नाशिकरोड, चेहेडी, म्हसरूळ, सातपूर, सिडको आदी भागातील जवळपास १२७ ठिकाणांना तलाठी व मंडळ अधिकाºयांनी भेटी देऊन प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या वाळू व खडी साठ्याचे पंचनामे केले आहेत.यात प्रामुख्याने शहरातील नवीन बांधकाम प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून, काही किरकोळ स्वरूपाचे काम करणाºया कामांच्या ठिकाणीही मिळालेल्या सुमारे ४५ हजार ब्रास वाळूचा पंचनामा करण्यात आला आहे.