शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांकडून तलाठ्यावर प्राणघातक हल्ला; नाशिक जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:41 IST

नाशिक : अवैध वाळूची वाहतूक करतांना वारंवार तलाठ्याकडून कारवाई केली जात असल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी सोमवारी सकाळी कार्यालयात जाणार्‍या तलाठ्याला एकटे गाठून प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांडके व लोखंडी टॉमीने केलेल्या बेदम मारहाणीत तलाठी यादव बच्छाव गंभीर जखमी झाले असून या घटनेने तलाठी कर्मचार्‍यामध्ये संतापाची लाट पसरली असून, ...

नाशिक : अवैध वाळूची वाहतूक करतांना वारंवार तलाठ्याकडून कारवाई केली जात असल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी सोमवारी सकाळी कार्यालयात जाणार्‍या तलाठ्याला एकटे गाठून प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांडके व लोखंडी टॉमीने केलेल्या बेदम मारहाणीत तलाठी यादव बच्छाव गंभीर जखमी झाले असून या घटनेने तलाठी कर्मचार्‍यामध्ये संतापाची लाट पसरली असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक शहरात सर्रासपणे चोरीची वाळू आणली जात असून, मध्यरात्री अथवा पहाटेच्या सुमारास वाळू माफियांकडून राज्य व राष्ट्रीय महामार्गाचा त्यासाठी वापर केला जातो. एकट्या दुकट्या तलाठ्याने वाळू वाहतूकीवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकारही यापुर्वी घडले आहेत. त्यामुळे वाळू माफियांची मुजोरी वाढली असून त्यातूनच सोमवारचा प्रकार घडला. गेल्या महिन्यात नाशिक तहसिलदार कार्यालयातील भरारी पथकाने नासर्डी पुलाजवळील शिवाजीवाडी येथून वाळू घेवून जाणारा मालट्रक संशयावरून अडविला असता, वडनेर दुमालाचे तलाठी यादव विठ्ठल बच्छाव (३५) यांनीच सदरचा मालट्रक अडवून त्याचा पंचनामा केला होता. सदर मालट्रकमध्ये वाळू होती त्याबाबतचे कोणतीही कागदपत्रे चालक व गाडी मालक सादर न करू शकल्याने सदरचा मालट्रक सील करून शिवाजीवाडी येथेच महसूल खात्याने उभा केलेला असून, तेव्हा पासूनच वाळू माफिया तलाठी यादव बच्छाव यांच्या मागावर होते. बच्छाव हे अशोका मार्गावर राहतात सोमवारी सकाळी आठ वाजता ते भाजीपाला घेण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल (जुने नागजी रूग्णालय)कडून दुचाकीवर जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोघांनी बच्छाव यांना अडविले व काही विचारपूस करण्यापुर्वीच मारहाण करण्यास सुरूवात केली. संबंधितांकडे लाकडी दांडुके व लोखंड गज असल्याचे पाहून बच्छाव जिवाच्या भितीने रस्त्त्याने पळत सुटले. परंतु हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून रस्त्यात गाठले व बेदम मारहाण केली. सकाळची वेळ असल्याने बच्छाव यांच्या मदतीला लवकर कोणी आले नाही, तो पर्यंत हल्लेखोरांनी त्यांना यथेच्छ मारहाण करून पलायन केले. या घटनेचे वृत्त कळताच तलाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बच्छाव यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहे.