शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाळू साडेआठ हजार रुपये ब्रास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:26 IST

शासनाचे नवीन वाळू धोरण, बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर आकारण्यात येणारा लाखो रुपयांचा दंड व वाळू उपसावर उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे बाजारात वाळूची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, अशातच शासकीय कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचे ठेकेदारांवर बंधने लादल्यामुळे वाळूचे दर आकाशाला भिडले आहेत. आठ ते साडेआठ रुपये ब्रास या दराने पैसे मोजूनही वाळू मिळत नसल्याने कामे संकटात सापडले आहेत.

नाशिक : शासनाचे नवीन वाळू धोरण, बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर आकारण्यात येणारा लाखो रुपयांचा दंड व वाळू उपसावर उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे बाजारात वाळूची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, अशातच शासकीय कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचे ठेकेदारांवर बंधने लादल्यामुळे वाळूचे दर आकाशाला भिडले आहेत. आठ ते साडेआठ रुपये ब्रास या दराने पैसे मोजूनही वाळू मिळत नसल्याने कामे संकटात सापडले आहेत.  राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी घोषित केलेल्या वाळू उपसा धोरणात नंतरच्या काळात आमूलाग्र बदल करण्यात आले असून, त्यातच पर्यावरण मंत्रालयाने तसेच न्यायालयाने सुचविलेल्या शिफारशींचा विचार करता वाळू ठिय्यांचा लिलाव घेऊन त्याची अधिकृत विक्री करणाºया ठेकेदारांनी यापूर्वीच या व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेक ठिय्यांचा लिलाव घेण्यास कोणी पुढे येत नाही. असे असतानाही शासनाने पुन्हा धोरणात बदल करून बेकायदा गौण खनिजाची वाहतूक करणाºयांना पाच पट दंड व गौणखनिजाचे स्वामित्वधन आकारण्यास सुरुवात केली. नवीन वर्षात पुन्हा एकदा अवैध वाळू उपसाला चाप लावण्यासाठी वाळू वाहतूक करणाºया वाहनांवरही लाखोंचा दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अवैध वाळूची वाहतूकही गेल्या महिन्यापासून मंदावली असून, परिणामी बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक ठरणारी वाळू मिळणे दुरापास्त झाले आहे. नेमका त्याचाच फायदा वाळूचा साठा करून ठेवलेल्यांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. साडेपाच हजार रुपये ब्रास मिळणारी वाळू कृत्रिम टंचाईमुळे साडेआठ हजार रुपये दरापर्यंत वाळूचे भाव वाढले आहेत मात्र इतका दर देऊनही वाळू मिळेलच याची कोणतीही शाश्वती मिळत नाही.वाळूच्या टंचाईचा फटका शासकीय कामांना बसत असून, बहुतांशी शासकीय बांधकामे पूर्ण करण्याची मुदत मार्चअखेरपर्यंत असून, वाळू मुळे गेल्या दोन महिन्यांपासून कामे बंद पडली आहेत. मध्यंतरी शासकीय ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन वाळू संदर्भात येणाºया अडचणीही कथन केल्या, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.महिनाभराचा कालावधीशासकीय कामे पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक असून, केलेल्या कामांचे देयके ठेकेदारांना मार्चअखेरीसच अदा केली जातात. परंतु कामेच पूर्ण नसतील तर देयके कशी मिळणार असा प्रश्न ठेकेदार स्वत:लाच विचारू लागले आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय