शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सासºयाचा खून, जावई ताब्यात सिन्नर : साडेचार वर्षांनंतर संशयिताला पकडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:31 IST

सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये घडली होती.

सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये घडली होती. तेव्हापासून संशयित फरार होता. या प्रकरणातील संशयित जावई सुमारे साडेचार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. सासºयाचा खून करणाºया संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कर्मचाºयांनी शेतमजूर व मेंढपाळाचा पेहराव धारण करून चांदवड तालुक्यातील बोपाने येथे छापा टाकून अटक केली. सदर गुन्हा घडल्यापासून संशयित सोमनाथ फुलाजी मोरे, रा. खंबाळे, ता. सिन्नर हा नंदुरबार जिल्ह्णात तसेच नाशिक जिल्ह्णात वेगवेगळ्या ठिकाणी नाव बदलून राहत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदवड तालुक्यातील बोपाने गावातून त्यास ताब्यात घेतले. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे एका शेतकºयाकडे सालकरी म्हणून काम करणाºया मयत आत्माराम नामदेव सूर्यवंशी यास नऊ मुली व मुलगा आहे. सूर्यवंशी कुटुंबीय मूळ संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथील असून, गेल्या काही वर्षापासून ते मजुरी काम करताना २०१३ साली नांदूरशिंगोटे शिवारात वास्तव्यास होते. सूर्यवंशी यांची एक मुलगी सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील सोमनाथ मोरे याला दिली होती. तथापि, सोमनाथ सदर मुलीस त्रास देत होता. त्यामुळे मुलगी सूर्यवंशी यांच्याकडे नांदूरशिंगोटे येथे होती. त्यांचा जावई सोमनाथ मोरे पत्नीला घेण्यासाठी नांदूरशिंगोटे येथे सूर्यवंशी यांच्याकडे आला होता. त्यावेळी सासरे सूर्यवंशी यांनी मुलीला जावयासोबत पाठविण्यास नकार दिला.त्यावेळी सासरा व जावई यांच्या शाब्दिक चकमक झाली होती. यात सासºयाने जावयाच्या थापड मारली होती. यावेळी जावई सोमनाथ त्याचा साडू विजय बर्डे यांच्यासमक्ष याने सासरे सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी सासरे आत्माराम नामदेव सूर्यवंशी (५५) यांचा मृतदेह बाजरीच्या शेतात आढळून आला. यावेळी अर्धा तासापूर्वी त्यांचा जावई सोमनाथ याला तेथून जाताना पाहिले होता. त्यामुळे सोमनाथ फुलाजी मोरे याने अज्ञात हत्याराने वार करून सूर्यवंशी यांचा खून केल्याची फिर्याद विजय बर्डे यांनी दिली होती. त्याप्रमाणे निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, हवालदार प्रकाश चव्हाणके, रवी वानखेडे, दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने चांदवड तालुक्यात बोपाने येथे वास्तव्यास असलेल्या संशयितास अटक करून वावी पोलिसांच्या ताब्यात दिले.