शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘समत्वगीतम्’मधून समरसतेचा विचार : इदाते

By admin | Updated: October 30, 2014 00:06 IST

‘समत्वगीतम्’मधून समरसतेचा विचार : इदाते

नाशिक : शंकराचार्य डॉ़ कूर्तकोटी रचित ‘समत्वगीतम्’ या संस्कृत काव्य पुस्तकात श्रीमद् भगवद्गीतेतील निवडक ३६१ श्लोकांच्या निरूपण असून, त्यांनी त्यातून समता व समरसता हे प्रमुख विचार मांडले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता मंचचे अखिल भारतीय संयोजक भिकूजी इदाते यांनी केले़ गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलमध्ये स्व़ डॉ़ म़ बा़ कुलकर्णी यांनी केलेल्या मराठी भाषेतील अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते़इदाते पुढे म्हणाले की, शंकराचार्यांनी जेव्हा या काव्याची रचना केली तो काळ हा करवट बदलण्याचा कालखंड होता़ देशाला जगातील सर्वश्रेष्ठ देश बनवायचे असेल तर परंपरा व चिंतन महत्त्वाचे असून, अनेक संकटे आपण याद्वारे परतवून लावली आहेत़ त्या-त्या कालावधीत झालेल्या महापुरुषांनी समाजाला प्रेरणा दिली़ शंकराचार्यांच्या या पुस्तकातून समत्व, समता आणि समरसता हे गुण पुढे येतात़ याबरोबरच धर्मातील मंत्र व श्लोक याचा अर्थ समरसतेतून शंकराचार्यांनी मांडल्याचे ते म्हणाले़बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरूपद स्वीकारण्याची पंडित मदनमोहन मालवीय यांनी घातलेली गळ, पं़ मोतीलाल नेहरूंची होमरूल चळवळीला आशीर्वाद देण्याची विनंती, लोकमान्य टिळकांनी नाशिक हे कार्यक्षेत्र करण्याची दाखविलेली दिशा, काळाराम मंदिर सत्याग्रहात डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांना दिलेले समर्थन, स्वातंत्र्यसेनानी डॉ़ मुंजे, स्वातंत्र्यवीर सावरकर, ऩ चिं़ केळकर यांच्यासोबत शंकराचार्यांचा असलेला संपर्क, सहवास यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते़शंकराचार्यांचे या पुस्तकाचे प्रकाशन गेल्यावर्षी इंग्रजी भाषेत झाले, तर यावर्षी १३५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मराठी भाषेत झाले आहे़ स्व़ डॉ़ म़ बा़ कुलकर्णी यांनी केलेल्या मराठी भाषांतरात शंकराचार्यांचा समत्वभाव लोकांसमोर आला आहे़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ मोगल यांनी, तर सूत्रसंचालन देवीदास जोशी यांनी केले़ (प्रतिनिधी)