लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : येथील समको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामंजूर ठराव इतिवृत्तात मंजूर केल्याप्रकरणी मालेगावच्या उपनिबंधकांना चौकशीचे आदेश मंगळवारी (दि.३) जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिल्यानंतर सायंकाळी उशिरा सभासद विजय भांगडिया यांनी सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले.संचालक मंडळाने पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे नामंजूर विषयाला मंजुरी देऊन सभासदांची फसवणूक करण्यात आल्याची तक्र ार सभासद भांगडिया यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने भांगडिया यांनी सोमवारपासून बँकेच्या आवारात उपोषण सुरू केले होते.सटाण्याचे सहायक निबंधक महेश भडांगे यांनी उपोषणकर्ते भांगडिया यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, मात्र चौकशीचे आदेश होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती.दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी या प्रकरणाची चौकशी मालेगावचे उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या आठ दिवसांतचौकशी अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, चौकशीचे आदेश दिल्यानंतर सायंकाळी उशिरा सहायकनिबंधक भडांगे यांनी लिंबू पाणी देऊन भांगडिया यांनी उपोषण मागे घेतले. याप्रसंगी डॉ. व्ही. के. येवलकर, झिप्रू अमृतकर, बिंदू शर्मा, दत्तू कापुरे, धर्मा सोनवणे आदी उपस्थित होते.
समको बॅँक : भांगडिया यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:10 IST
सटाणा : येथील समको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामंजूर ठराव इतिवृत्तात मंजूर केल्याप्रकरणी मालेगावच्या उपनिबंधकांना चौकशीचे आदेश मंगळवारी (दि.३) जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिल्यानंतर सायंकाळी उशिरा सभासद विजय भांगडिया यांनी सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
समको बॅँक : भांगडिया यांचे उपोषण मागे
ठळक मुद्दे सोमवारपासून बँकेच्या आवारात उपोषण सुरू केले होते.