शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

शनिवारी सामूहिक नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:55 IST

‘ईद-उल-अज्हा’अर्थात बकरी ईद येत्या शनिवारी साजरी केली जाणार आहे. सकाळी पारंपरिक पद्धतीने दहा वाजता ईदगाहवर सामूहिकरीत्या नमाजपठण केले जाणार असल्याचे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे.

नाशिक : ‘ईद-उल-अज्हा’अर्थात बकरी ईद येत्या शनिवारी साजरी केली जाणार आहे. सकाळी पारंपरिक पद्धतीने दहा वाजता ईदगाहवर सामूहिकरीत्या नमाजपठण केले जाणार असल्याचे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे. इस्लामी कालगणनेचा उर्दू महिना जिलहिज्जा सुरू झाला असून या बकरी ईद या महिन्याच्या दहा तारखेला साजरी करण्याची प्रथा आहे. यानुसार येत्या शनिवारी मुस्लीम बांधव हा सण साजरा करणार आहे. दरम्यान, ईदचे सामूहिक नमाजपठण ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर खतीब यांच्या नेतृत्त्वाखाली संपन्न होणार आहे. या महिन्यात मुस्लीम बांधवांकडून हज यात्रा पूर्ण केली जाते. यावर्षी तीस तारखेपासून हज यात्रेला प्रारंभ होणार आहे. ईदच्या दिवशी हजचा मुख्य विधी पूर्ण होणार असून पुढे चार दिवस यात्रा सुरू राहणार आहे. प्रत्येक यात्रेक रू सुमारे चाळीस दिवस हज यात्रेसाठी सौदी अरेबियामध्ये मुक्कामी असतो.बकरी ईदच्या निमित्ताने शहरातील सुन्नी मरकजी सिरत समितीच्या वतीने खतीब यांनी सर्व कायदे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कुर्बानी करताना कुठल्याही कायद्याचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन शुक्रवारी विशेष नमाजपठणादरम्यान, सर्व धर्मगुरूंनी केले. बकरी ईदच्या नमाजपठणाची तयारी करण्यात येत असून, शहरात उत्साहाचे वातावरण आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता सर्वच मशिदींमध्येही नमाजपठणाची व्यवस्था राहणार आहे.