शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भूमाफियांकडून मृत व्यक्तीच्या जमिनीची विक्री

By admin | Updated: June 23, 2015 00:50 IST

भूमाफियांकडून मृत व्यक्तीच्या जमिनीची विक्री

नाशिक : पंधरा वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावे पडून असलेला लाखो रुपये किमतीचा प्लॉट परस्पर विक्री करण्यासाठी बनावट व्यक्ती व बनावट पॅन कार्ड तयार करणाऱ्या भू-माफियांचे कृत्य दिंडोरी प्रांत अधिकाऱ्यांनी उधळून लावले असून, यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ ओझर टाऊनशिप येथे राहणारे दर्शनलाल ओमप्रकाश चोपडा यांचा दिंडोरी तालुक्यातील मौजे जऊळके या ठिकाणी सर्व्हे नंबर १५३/५ मध्ये ४०९ चौरस मीटरचा प्लॉट आहे. चोपडा यांचे सन २००० मध्ये ठाणे येथे निधन झाल्याने सदरचा प्लॉट तसाच पडून होता. दरम्यान, जऊळके शिवारातच नवीन विमानतळ पूर्ण झाल्यामुळे येथील जमिनींचे भाव गगनाला भिडल्याचे पाहून भू-माफियांनी गेल्या अनेक वर्षांपासून पडीत असलेल्या चोपडा यांच्या प्लॉटचा शोध घेऊन त्याची परस्पर विक्री केली. नाशिकरोड येथील नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या संपत हिरामण आवारी याने यात महत्त्वाची भूमिका बजावत चोपडा यांच्या नावे असलेल्या प्लॉट आपल्या नावे करताना दर्शनलाल चोपडा म्हणून बनावट व्यक्ती दुय्यम निबंधकांसमोर उभी केली, त्यासाठी चोपडा यांच्या नावे बनावट पॅन कार्डही तयार करून घेतले. या बेकायदेशीर व्यवहारात ओझर मिग येथे राहणारा राजू नाना सोनवणे व नाशिकरोड चेहडीपंपिंग परिसरात राहणारा दीपक हरबनसिंग ठाकूर या दोघांनी मदत केली. दुय्यम निबंधकांसमोर नोंदविण्यात आलेल्या या व्यवहाराची तलाठी दप्तरात फेरफार नोंदही घेण्यात आल्याने हा व्यवहार कायदेशीर झाल्याचे समजून संपत आवारी याने सदरचा प्लॉट कोणा शहा नामक व्यक्तीला ४० लाख रुपयांना विकूनही टाकला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मयत दर्शनलाल चोपडा यांच्या मुलाने तलाठी कार्यालयात अर्ज करून वडिलांच्या प्लॉटवर आपले नाव लावण्याची विनंती केली, त्यासाठी त्याने दर्शनलाल यांचा मृत्यूचा दाखलाही सादर केला. चोपडा यांच्या मुलाचा अर्ज आल्यानंतर तलाठ्यांनी चौकशी सुरू केली असता उपरोक्त प्रकार उघडकीस येऊन त्यांनी प्रांत अधिकारी मुकेश भोगे यांच्या कानी घातला. त्यावर भोगे यांनी स्वत:हून प्रकरण दाखल करून घेत, जागा मालक शहा तसेच त्यांना प्लॉट विक्री करणारे व मदत करणारे अशा चौघांना नोटीस बजावली; परंतु शहा वगळता कोणीच चौकशीसाठी उपस्थित झाले नाही. या प्रकरणाच्या खोलवर जाण्यासाठी चोपडा यांच्या नावे सादर करण्यात आलेल्या पॅन कार्डची वैधता तपासली असता तेदेखील बनावट असल्याचे उघडकीस आले.