शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या साक्षी, ईश्वरी, रसिका महाराष्ट्र क्रिकेट संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST

नाशिक : नाशिकच्या साक्षी कानडी, ईश्वरी सावकार व रसिका शिंदे या तीन खेळाडूंची महाराष्ट्रातर्फे एकोणीस वर्षांखालील महिला ...

नाशिक : नाशिकच्या साक्षी कानडी, ईश्वरी सावकार व रसिका शिंदे या तीन खेळाडूंची महाराष्ट्रातर्फे एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे.

साक्षीने मागील हंगामात पुदुचेरी येथे खेळविण्यात आलेल्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचेदेखील प्रतिनिधित्व केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे १९ वर्षांखालील महिलांसाठी ५० षटकांची एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल एनडीसीएचे अध्यक्ष विनोद शहा आणि सचिव समीर रकटे यांनी त्यांचे अभिनंदन केले. निवड झालेल्या महिला संघाचे स्पर्धेपूर्वी पुणे येथे गोवा महिला संघसोबत सराव सामने खेळविण्यात येत आहेत. महाराष्ट्र संघाचा समावेश एलिट डी गटात असून, महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेचे साखळी सामने २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान सुरत येथे खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्राचे सामने सौराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड , आंध्र प्रदेश, चंदिगड यांच्याविरुद्ध रंगणार आहेत.

फोटो

०८साक्षी

०८ईश्वरी

०८रसिका