शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वंजारवाडी, लोहशिंगवे ग्रामस्थांचे स्वतंत्र सिंगल फेजसाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

वंजारवाडी व लोहशिंगवे या दोन्हीही गावांना अनेक दिवसांपासून विजेचा प्रश्न भेडसावत असून, विजेच्या दैनंदिन खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे येथील ...

वंजारवाडी व लोहशिंगवे या दोन्हीही गावांना अनेक दिवसांपासून विजेचा प्रश्न भेडसावत असून, विजेच्या दैनंदिन खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे येथील विद्यार्थ्यांना ऑनलाइनप्रणालीनुसार अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, तसेच महिलांनादेखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासारख्या अनेक अडचणींना येथील ग्रामस्थांना भर पावसाळ्यात सामना करावा लागत असून, येथील अनेक नागरिक गावाच्या जवळपास असलेल्या शेतवस्तीवर राहत असल्यामुळे येथे नेहमीच हिंस्त्रश्वापदांचा वावर असतो. यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या दोन्हीही गावांना स्वतंत्र २४ तास सिंगल फेज वीजपुरवठा देण्यात यावा अशी मागणी वंजारवाडी व लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी भगवान जुंद्रे, वंजारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, लोहशिंगवेचे सरपंच युवराज जुंद्रे, लोहशिंगवेचे माजी सरपंच संतोष जुंद्रे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर शिंदे, माजी सरपंच भास्कर रायकर, चंद्रभान शिंदे, निवृत्ती शिंदे, बाळू शिंदे, भाऊसाहेब जैन, संपत सामोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट...

‘दैनंदिन खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे येथील नागरिक मेटाकुटीला आले असून, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतवस्तीवर हिंस्त्र श्वापदांच्या भीतीमुळे दुग्ध व्यावसायिकांना अंधारातच ये-जा करावी लागत आहे. याआधी या परिसरात अनेक वेळा रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्लेदेखील केले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या दोन्हीही गावांना २४ स्वतंत्र सिंगल फेज वीजपुरवठा देण्यात यावा.

- ज्ञानेश्वर शिंदे, सरपंच, वंजारवाडी

----------------------

फोटो- १२ गोडसे निवेदन

वंजारवाडी व लोहशिंगवे ग्रामस्थांच्या वतीने २४ तास सिंगल फेज वीजपुरवठा देण्यात यावा याबाबतचे निवेदन खासदार हेमंत गोडसे यांना देताना सरपंच ज्ञानेश्वर शिंदे. समवेत लोहशिंगवेचे माजी सरपंच संतोष जुंद्रे व इतर.

120921\12nsk_23_12092021_13.jpg

फोटो- १२ गोडसे निवेदन